ETV Bharat / elections

शिवसेनेतील 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता होणार कट? नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

author img

By

Published : Sep 18, 2019, 1:27 PM IST

Updated : Sep 18, 2019, 4:03 PM IST

शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार की नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मात्र शिवसेनेकडून २८८ मतदारसंघात चाचपणी केली जात आहे. शिवसेनेत झालेले इनकंमिग आणि इच्छुकांची वाढती संख्या पाहता विद्यमान आणि काही इच्छुक माजी आमदारांच्या उमेदवारीवर गदा येण्याची दाट शक्यता आहे.

शिवसेनेतील "या" विद्यमान आमदारांचा पत्ता होणार कट? नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

मुंबई - शिवसेना विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये भाकरी फिरवण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांच्या सक्रियतेमुळे अनेक मतदारसंघात युवासेनेच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर काही विद्यमान आमदारांचाही पत्ता कट होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.

शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार की नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मात्र शिवसेनेकडून २८८ मतदारसंघात चाचपणी केली जात आहे. शिवसेनेत झालेले इनकंमिग आणि इच्छुकांची वाढती संख्या पहाता विद्यमान आणि काही इच्छुक माजी आमदारांच्या उमेदवारीवर गदा येण्याची दाट शक्यता आहे.

यांचा पत्ता होणार कट?

वरळी मतदारसंघ

मुंबईमध्ये ३६ मतदारसंघात शिवसेनेच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात वरळी मतदासंघातून विद्यमान आमदार सुनिल शिंदे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या ऐवजी राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या सचिन अहिर यांना उमेदवारी मिळू शकते. शिवाय आशिष चेंबुरकरही उमेदवारी मिळावी या प्रयत्नात आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघ

विद्यमान शिवसेना आमदार तृप्ती सावंत यांची उमेदावारी धोक्यात आहे असे समजली जाते. तिथे मुंबईचे महापौर विश्नाथ म्हाडेश्वर किंवा विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांना शिवसेना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. दहिसर मतदारसंघातून माजी आमदार विनोद घोसाळकर पून्हा एकदा इच्छुक आहे. मात्र, त्याच मतदारसंघातून माजी महापौर शुभा राऊळ आणि शितल म्हात्रे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते.

कलिना मतदारसंघ

विद्यमान आमदार संजय पोतनिस यांच्या उमेदवारीवरही गंडांतर येवू शकते. काँग्रेसनेते कृपाशंकरसिंह यांना भाजपने प्रवेश दिलेला नाही. ते दुसरा पर्याय म्हणून शिवसेनेत प्रवेश करू शकतात. तसे झाल्यास त्यांना कलिना मतदारसंघातून उमेदवारी देण्याची ऑफर शिवसेनेने दिल्याचे सुत्रांकडून समजते.

कोकण

कोकणातही शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे. श्रीवर्धन मतदारसंघात मागील निवडणूकीत शिवसेनेच्या रवी मुंडे यांनी अवधुत तटकरें यांना चांगलीच टक्कर दिली होती. त्यात मुंडे यांचा निसटता पराभव झाला होता. यावेळी मुंडे श्रीवर्धन मधून इच्छुक आहे. मात्र, अवधुत तटकरे यांनीच शिवसेनेत प्रवेश केल्याने मुंडे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

दापोली मतदारसंघ

दापोली मतदारसंघाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. यामतदासंघातून शिवसनेचे सुर्यकांत दळवी पून्हा एकदा इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दावा सांगितला आहे. तिथून त्यांना त्याचा मुलगा योगेश कदम यांच्यासाठी उमेदवारी हवी आहे. उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असलेल्या थेट संबंधांमुळे पाच वेळा आमदार राहिलेल्या दळवी यांचा यावेळी पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

शहापूर मतदारसंघ

शहापूर मतदारसंघातील विद्यमान आमदार पांडुरंग वरोरा यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून हातात शिवबंधन बांधले. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांचा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित आहे. या मतदारसंघात जवळपास ८ जण इच्छुक आहेत.

करमाळा मतदारसंघ

करमाळा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार नारायण पाटील यांचीही उमेदवारी धोक्यात आहे. या मदारसंघात राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उमेदावारी देणार या अटीवरच त्यांनी सेनेत प्रवेश केला आहे.

Intro:Body:

शिवसेनेतील "या"  विद्यमान आमदारांचा पत्ता होणार कट ? नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी 

मुंबई - शिवसेना विधानसभा निवडणुकीत काही मतदार संघामध्ये भाकरी फिरवण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांच्या सक्रियतेमुळे अनेक मतदारसंघात युवासेनेच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर काही विद्यमान आमदारांचाही पत्ता कट होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. 

शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार की नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मात्र शिवसेनेकडून २८८ मतदारसंघात चाचपणी केली जात आहे. शिवसेनेत झालेले इन कंमिग आणि इच्छुकांची वाढती संख्या पहाता विद्यामान आणि काही इच्छुक माजी आमदारांच्या उमेदवारीवर गदा येण्याची दाट शक्यता आहे. 

 यांचा पत्ता होणार कट? 

मुंबईमध्ये ३६ मतदारसंघात शिवसेनेच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात वरळी मतदासंघातून विद्यमान आमदार सुनिल शिंदे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या ऐवजी राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या सचिन अहिर यांना उमेदवारी मिळू शकते. शिवाय आशिष चेंबुरकरही उमेदवारी मिळाली या प्रयत्नात आहे. 

वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान शिवसेना आमदार तृप्ती सावंत यांची उमेदावारी धोक्यात समजली जाते. तिथे मुंबईचे महापौर विश्नाथ म्हाडेश्वर किंवा विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांना शिवसेना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. दहिसर मतदारसंघातून माजी आमदार विनोद घोसाळकर पून्हा एकदा इच्छुक आहे. मात्र त्याच मतदारसंघातून माजी महापौर शुभा राऊळ आणि शितल म्हात्रे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. कलिना विधानसभेचे विद्यमान आमदार संजय पोतनिस यांच्या उमेदवारीवरही गंडांतर येवू शकते. काँग्रेसनेते कृपाशंकरसिंह यांना भाजपने प्रवेश दिलेला नाही. ते दुसरा पर्याय म्हणून शिवसेनेत प्रवेश करू शकतात. तसे झाल्यास त्यांना कलिना मतदारसंघातून उमेदवारी देण्याची ऑफस शिवसेनेनं दिल्याचे सुत्रांकडून समजते. 

कोकणातीही शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे. श्रीवर्धन मतदारसंघात मागील निवडणूकीत शिवसेनेच्या रवी मुंडे यांनी अवधुत तटकरें यांना चांगली लढत दिली होती. त्यात मुंडे यांचा निसटता पराभव झाला होता. यावेळी मुंडे श्रीवर्धन मधून इच्छुक आहे. मात्र अवधुत तटकरे यांनीच शिवसेनेत प्रवेश केल्याने मुंडे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. 

दोपोली मतदारसंघाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. यामतदासंघातून शिवसनेचे सुर्यकांत दळवी पून्हा एकदा इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दावा सांगितला आहे. तिथून त्यांना त्याचा मुलगा योगेश कदम यांच्यासाठी उमेदवारी हवी आहे. उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असलेल्या थेट संबधामुळे पाच वेळा आमदार राहिलेल्या दळवी यांचा यावेळी पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.   

शहापूर मतदारसंघातील विद्यमान आमदार पांडुरंग बरोबर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून शिवबंधन हातात बांधले. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांचा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित आहे. या मतदारसंघात जवळपास ८ जण इच्छुक आहेत. 

करमाळा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार नारायण पाटील यांचीही उमेदवारी धोक्यात आहे. या मदारसंघात राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उमेदावारी देणार या अटीवरच त्यांनी सेनेत प्रवेश केला आहे. 

Conclusion:
Last Updated : Sep 18, 2019, 4:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.