ETV Bharat / elections

भाजपला शिवसेना 'नकोशी' झालीये का? - बाळासाहेब ठाकरें, अटलबिहीरी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी

भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर आजपर्यंत एकत्र लढले. शिवसेनेची आक्रमकता भाजपने जवळुन पाहिली आहे. राज्याच्या राजकारणात शिरकाव करण्यापासून ते सर्वात मोठा पक्ष म्हणुन भाजपच्या उदयात शिवसेनेची भूमिका महत्वाची ठरली आहे. त्यामुळे शिवसेना विरोधी पक्षात राहिल्यास आपल्याला जेरीस आणु शकते, याची भाजपला कल्पना आहे. 2014 च्या निवडणुकांनंतर सत्तेत सहभागी व्हायच्या आधी तीन महिन्यांच्या काळात शिवसेनेने ते दाखवून पण दिले आहे. त्यामुळे शिवसेना विरोधी बाकावर बसलेली आपल्या गैरसोयीचे असल्याचे भाजपच्या ध्यानात आहे.

भाजपला खरच शिवसेना 'नकोशी' झालीये?
author img

By

Published : Sep 22, 2019, 3:49 PM IST

मुंबई - सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहतंय. विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागावाटपाचा तीढा सुटला आहे. काही जागांवरील उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, पारंपरिक मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना भाजपची अजूनही जागावाटपांवरून जुंपली आहे. पहिले समान जागावाटपाबाबत भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्ये. तर आता मुख्यमंत्री आमचाच असेल याबाबत भाजपकडून रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. समान जागांच्या मागणीवर शिवसेना ठाम आहे. तर, मित्रपक्षांसह भाजप 163 जागांवर दावा करत आहे. भाजप माघार घेण्यास तयार नाही. शिवसेनेला दाबण्याचा ती प्रयत्न करत आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

समविचारी प्रादेशीक पक्षांना सोबत घेत भाजपने आजवर अनेक राज्यांत आपला विस्तार केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकांनंतर याच प्रादेशीक मित्र पक्षांचे महत्व कमी करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. राज्यातील 2014 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान युती तुटल्याची घोषणा करत त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. या निवडणुकीत भाजपने 122 तर शिवसेनेने 63 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी निवडणुकी दरम्यान एकमेकांवर आग पाखड करणारे नेते पुन्हा एक झाले होते. राज्यात आपल्याला एकमेकांशिवाय पर्याय नाही, हे दोन्ही पक्षांना कळुन चुकले होते. परंतु केंद्रातील सत्तेच्या जोरावर भाजपने राज्यात पक्ष मजबुत करण्याचा प्रयत्न केला. अनेक विरोधीपक्षातील नेतेमंडळींना आपल्या कळपात आणुन भाजपने आपले हात पाय पसरवले आहेत. पण त्याच वेळी शिवसेनेच्या ताब्यातील आणि वर्चस्व असणाऱ्या मतदारसंघात सुध्दा भाजपने आपली ताकद वाढवायला सुरूवात केली. त्यात त्यांना यशही आले. सातारा, उस्मानाबाद, औसा, करमाळा ही त्याची काही उदाहरणे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व कमी करण्याच्या हालचाली भाजपने पहिलेच सुरू केल्या आहेत. तरिही आपण युती करण्यासाठी आग्रही असल्याचे भाजपची नेते मंडळी वरकरणी सांगत असते.

भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर आज पर्यंत एकत्र लढले. शिवसेनेची आक्रमकता भाजपने जवळुन पाहिली आहे. राज्याच्या राजकारणात शिरकाव करण्यापासून ते सर्वात मोठा पक्ष म्हणुन भाजपच्या उदयात शिवसेनेची भुमीका महत्वाची ठरली आहे. त्यामुळे शिवसेना विरोधी पक्षात राहिल्यास आपल्याला जेरीस आणु शकते याची भाजपला कल्पना आहे. 2014 च्या निवडणुकांनंतर सत्तेत सहभागी व्हायच्या आधी तीन महिन्यांच्या काळात शिवसेनेने ते दाखवून पण दिले आहे. त्यामुळे शिवसेना विरोधी बाकावर बसलेली आपल्याच गैरसोयीचे असल्याचे भाजपला माहिती आहे. त्यामुळे सेनेला सोबत ठेऊन आपला जनाधार वाढवायचा, सेनेची ताकद, आक्रमकता हळु हळु कमी करायची, अशी भाजपची रणनीती आहे. तसेच संख्याबळाच्या बाबतीत ऐन वेळी शिवसेनाच कामी येईल, हा विश्वासही भाजपला आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाला गोंजारत भाजप आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे.

देशभराच्या राजकारणाववर 'युती'चा प्रभाव

बाळासाहेब ठाकरे, अटलबिहीरी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्यात बोलणी घडवून आणत प्रमोद महाजनांना युतीची मोट बांधण्यात यश आले होते. 1990 मध्ये पहिल्यांदा राज्यात या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढल्या. तेव्हापासून 2014 पर्यंत ही युती अभेद्य होती. मात्र, 2014 नंतर परिस्थीती बदलली. भाजपने मित्रपक्षांच्या साथीने अनेक राज्यांत पाय पसरले. आता त्याच मित्रपक्षांना संपवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे आरोप देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी केले आहे. 2014 च्या विधानसभा निवणूकीवेळी सर्वात जुना सोबती असलेल्या शिवसेना नेत्यांनीही जाहीर आरोप केले. त्या आरोपांना पुष्टी मिळाली तर देशभरात भाजप नेतृत्वाबद्दल अविश्वास निर्माण होईल. हे टाळण्यासाठीच भाजप शिवसेनेला खेळवत ठेवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महाराष्ट्रात तर शिवसेना आणि भाजपच्या मतदारांशिवाय एक गट अजून आहे. जो 'युतीचा मतदार' म्हणून ओळखला जातो. हा वर्ग अजूनही हे दोन्ही पक्ष एकत्र लढावेत ही ईच्छा बाळगुन आहे. मागील निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे लढल्याने या मतांचे विभाजन झाले. ही मते पुर्णत: आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. आपली राजकीय परिहार्यता दाखवत मागील निवडणूकीतही भाजपने या मतांसाठी जोगवा मागीतला. पण, शिवसेनेला या वर्गाची सहानुभूती मिळू नये अशी त्यांची ईच्छा आहे. या व्युवरचनेचा भाग म्हणजेच भाजप शिवसेनेला देत असलेली वागणूक. सध्याच्या काळात भाजप शिवसेनेशी काडीमोड घेण्याच्या विचारात नाही ते एवढ्याच कारणांमुळे.

Intro:Body:

nail-3x2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.