ETV Bharat / elections

माढा शहरात नाही एकही लॉज अन् चित्रपटगृह, तरीही लोकसभा मतदारसंघाला नाव दिल्यामुळे देशात प्रसिद्ध - शरद पवार

माढा शहर अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. या शहरामध्ये साधी निवासाची देखील व्यवस्था नाही.

माढा बसस्थानक
author img

By

Published : Apr 10, 2019, 1:13 PM IST

Updated : Apr 10, 2019, 4:20 PM IST

सोलापूर - संपूर्ण राज्यात माढा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्या शहराच्या नावावरून या लोकसभा मतदारसंघाला माढा असे नाव देण्यात आले आहे. त्या शहरामध्ये एकही लॉज आणि चित्रपटगृह नाही. यामुळे माढ्याचा विकास झाला का? हा मुद्दा या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

माढा शहर

लोकसभा मतदारसंघाची २००८ मध्ये पुनर्रचना झाली आणि या पुनर्रचनेनंतर २००९ च्या लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीमध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी निवडणूक लढवली. त्यानंतर हा मतदारसंघ चर्चेत आला. यावेळी मात्र, येथील निवडणूक खूप प्रतिष्ठेची झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खुद्द पवारांनी या मतदार संघात आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मात्र, असे असले तरी ज्या शहराच्या नावावरून या लोकसभा मतदारसंघाला नाव देण्यात आलेले आहे. ते माढा शहर मात्र, अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. या शहरामध्ये साधी निवासाची देखील व्यवस्था नाही.

माढा हा तालुका असला तरीही तालुक्याच्या ठिकाणी आवश्यक असणार्‍या प्राथमिक कोणत्याही सुख-सुविधा या शहरात नाहीत. या शहराच्या नावावरून तालुक्याला तसेच विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघाला नाव दिले आहे. तरीही ही हे शहर फक्त म्हणायला शहर आहे, बाकी त्याची गणती एका मोठ्या खेड्यातच करावी लागते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत माढा ही ग्रामपंचायत होती. आता कुठे ती नगरपंचायत झाली आहे. हे तालुक्याचे शहर असले तरीही याठिकाणी सर्व सुख-सुविधा माढापासून जवळच असलेल्या कुर्डूवाडी या ठिकाणी आहेत. तालुक्याची अनेक प्रशासकीय कार्यालय ही कुर्डूवाडी येथेच आहेत. नव्याने तयार करण्यात आलेले तहसील कार्यालय फक्त शहरात आहे, बाकी पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कृषी विभागाचे कार्यालय यासह प्रमुख महत्त्वाची सर्व कार्यालये कुर्डूवाडीत आहेत.

माढा शहरापासून जवळच कुर्डूवाडी हे मोठे रेल्वे स्टेशन आहे. तसेच येथे दळणवळणाच्या चांगल्या सुविधा असल्यामुळे मोठी बाजारपेठ आणि नगरपालिका आहे. या ठिकाणी प्रशासकीय आणि आणि इतर महत्त्वाची कार्यालये असून ती तालुक्यातील सर्व लोकांना सोयीस्कर पडतात. त्यामुळे ज्या माढा शहराच्या नावावरून तालुका विधानसभा मतदार संघ आणि लोकसभा मतदारसंघाला नाव देण्यात आले. ते शहर मात्र, विकासापासून अजूनही दूरच आहे.

Intro:लॉज आणि चित्रपटगृह नसलेलं माढा शहर,
लोकसभा मतदार संघाला नाव दिल्या मुळें देशात प्रसिद्ध

सोलापूर-
माढा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे. ज्या माढा शहराच्या नावावरून या लोकसभा मतदारसंघाला माढा असे नाव देण्यात आलेला आहे त्या माढा शहरांमध्ये ना लॉज आहे करमणुकीसाठी एखादं चित्रपटगृह. संपूर्ण राज्यासह देशभरात चर्चेत आलेला माढा शहर नेमका आहे तरी कसं पाहुयात ईटीव्ही भारतचा विशेष वृत्तांत.

Body:2008 मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि या पुनर्रचनेनंतर 2009च्या लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या. 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि केंद्रातील कृषिमंत्री शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला खुद्द शरद पवारांनी ज्या माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खुद्द शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघ प्रतिष्ठेचा केला आहे ज्या शहराच्या नावावरून या लोकसभा मतदारसंघाला नाव देण्यात आलेले आहे ते माढा शहर मात्र अजूनही विकासापासून कोसो दूर आहे माढा शहरामध्ये साधी निवासाची देखील व्यवस्था नाही माढा शहरात एकही ही व्यवस्थित अशी लॉज नाही या शहरात चित्रपट गृह देखील नाही.

माढा हा तालुका असला तरीही तालुक्याच्या ठिकाणी वश्यक असणार्‍या प्राथमिक कोणत्याही सुख-सुविधा या शहरात नाहीत महाडा शहराच्या नावावरून तालुक्याला तसेच विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघाला नाव दिले असले तरीही ही माड आहे फक्त म्हणायला शहर आहे हे बाकी त्याची ची गणपती एका मोठ्या खेड्यातच करावी लागेल. महाड आहे फक्त नावालाच तालुक्याचे ठिकाण आहे दोन वर्षांपूर्वीपर्यंत माढा ही ग्रामपंचायत होती आता कुठे ती नगरपंचायत झाली आहे माड आहे तालुक्याचे शहर असले तरीही ही सर्व सुख-सुविधा या महाडा शहरा एवजी म्हाडा पासून जवळच असलेल्या कुर्डूवाडी या ठिकाणी आहेत तालुक्याची अनेक प्रशासकीय कार्यालय ही कुर्डूवाडी येथेच आहेत नव्याने तयार करण्यात आलेले तहसील कार्यालय तेवढेच काय ते महाडा शहरात आहे बाकी पंचायत समिती ती कृषी उत्पन्न बाजार समिती ती कृषी विभागाचे कार्यालय यासह प्रमुख महत्त्वाची सर्व कार्यालयही ही कुर्डूवाडी येथेच आहेत.
माढा शहरापासून जवळच असलेले कुरूडवाडी हे हे मोठे रेल्वे स्टेशन आहे तसेच कुर्डूवाडी येथेच दळणवळणाच्या चांगल्या सुविधा मागील अनेक वर्षापासून असल्यामुळेच मोठी बाजारपेठही कुर्डुवाडी येथे ये तयार झालेली आहे कुर्डूवाडी हे मागील अनेक वर्षापासून नगरपालिका असलेले शहर असल्यामुळेच याच ठिकाणी प्रशासकीय कार्यालय आणि आणि इतर महत्त्वाची कार्यालये सुरू केल्यामुळे तालुक्यातील सर्व लोकांना सोयीस्कर झाले आहे असे असले तरीही ही ज्या महाडा शहराच्या नावावरून तालुका विधानसभा मतदार संघ आणि लोकसभा मतदारसंघही ही नाव देण्यात आले ते माढा शहर मात्र विकासापासून अजूनही दूरच आहे.

Conclusion:
Last Updated : Apr 10, 2019, 4:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.