नांदेड - भाजप उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या प्रचार रॅलीत आज बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर सहभागी झाली. सकाळी १० वाजता तरोडा नाका येथून ही रॅली निघाली. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.
तरोडा नाका येथून निघालेल्या या रॅलीचा वर्कशॉप, श्रीनगर, आयटीआय, शिवाजीनगर, कलामंदिर, मुथा चौक, शिवाजी पुतळा, गांधी पुतळा, चिखलवाडी, गुरुद्वारा चौरस्ता, भगतसिंग चौक मार्गे जुना मोंढा टॉवर येथे समारोप झाला.
या रॅलीत सिनेअभिनेत्री इशा कोप्पीकर यांच्यासह भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक यांचाही सहभाग होता.