ETV Bharat / elections

भोपाळमध्ये साध्वींनी बजावला मतदानाचा हक्क; दिग्विजय सिंहाचे मात्र स्वत:साठी मत नाहीच - मतदान

यावेळी बोलताना साध्वी यांनी ही निवडणूक धर्म युद्ध असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच भाजपला संपूर्ण राज्यात सगळ्यात जास्त जागा मिळतील आणि नरेंद्र मोदी पु्न्हा एकदा पंतप्रधान होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

साध्वी ठाकूर आणि दिग्विजय सिंह
author img

By

Published : May 12, 2019, 5:01 PM IST

भोपाळ - लोकसभा निवडणुकीचा सहावा आणि मध्यप्रदेशमधील तिसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. येथील भोपाळ मतदारसंघात भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघासाठी देखील आजच मतदान होत आहे. दरम्यान, भाजप उमेदवार साध्वी ठाकूर यांनी भोपाळमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मात्र, काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह हे स्वत: या ठिकाणी मतदान करू शकले नाहीत. कारण, ते या मतदारसंघाचे मतदार नाहीत.

दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज सकाळी रेवेरा टाऊन येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना साध्वी यांनी ही निवडणूक धर्म युद्ध असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच भाजपला संपूर्ण राज्यात सगळ्यात जास्त जागा मिळतील आणि नरेंद्र मोदी पु्न्हा एकदा पंतप्रधान होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान हे लोकशाहीमधील सर्वात महत्वाचे कर्तव्य असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

दिग्विजय सिंह यांचे मतदान मध्यप्रदेशच्या राजगढ लोकसभा मतदारसंघात त्यांच्या मुळ गावी राघवगढ मध्ये आहे. मात्र, ते उमेदवार म्हणून भोपाळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे त्यांना स्वत:साठी मतदान करता आले नाही.

यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान हे लोकशाहीमधील सर्वात महत्वाचे कर्तव्य असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Intro:Body:

भोपाळमध्ये साध्वींनी बजावला मतदानाचा हक्क;  दिग्विजय सिंहाचे मात्र स्वत:साठी मत नाहीच

भोपाल -  लोकसभा निवडणुकीचा सहावा आणि मध्यप्रदेशमधील तिसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. येथील भोपाळ मतदारसंघात भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघासाठी देखील आजच मतदान होत आहे. दरम्यान, भाजप उमेदवार साध्वी ठाकूर यांनी भोपाळमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मात्र, काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह हे स्वत: या ठिकाणी मतदान करू शकले नाहीत. कारण, ते या मतदारसंघाचे मतदार नाहीत.

दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज सकाळी रेवेरा टाऊन येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना साध्वी यांनी ही निवडणूक धर्म युद्ध असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच भाजपला संपूर्ण राज्यात सगळ्यात जास्त जागा मिळतील आणि नरेंद्र मोदी पु्न्हा एकदा पंतप्रधान होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान हे लोकशाहीमधील सर्वात महत्वाचे कर्तव्य असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

दिग्विजय सिंह यांचे मतदान मध्यप्रदेशच्या राजगढ लोकसभा मतदारसंघात त्यांच्या मुळ गावी राघौगढ मध्ये आहे. मात्र, ते उमेदवार म्हणून भोपाळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे त्यांना स्वत:साठी मतदान करता आले नाही.

यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान हे लोकशाहीमधील सर्वात महत्वाचे कर्तव्य असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.