ETV Bharat / elections

गोवा विधानसभा सभापती निवडणूक; भाजपतर्फे राजेश पाटणेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल - paratapsinh rane

गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे.भाजप आमदार राजेश पाटणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी'आमच्याकडे पूर्ण बहूमत असून आम्ही सभापतीपदाची निवडणूक निश्चित जिंकणार आहोत. सरकारमधील आघाडीचे घटकपक्ष, अपक्ष आमच्यासोबत आहेत', असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

राजेश पाटणेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
author img

By

Published : Jun 3, 2019, 2:02 PM IST

पणजी - गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे. त्यासाठी आज (सोमवार) सत्ताधारी भाजपतर्फे आमदार राजेश पाटणेकर यांनी तर काँग्रेसकडून आमदार प्रतापसिंह राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे. तत्कालीन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर मागील 18 एप्रिलपासून हे पद रिक्त होते. याचा प्रभार उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे देण्यात आला होता.

राजेश पाटणेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
भाजप आमदार राजेश पाटणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, बाबू आजगावकर, गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि विविध खात्याचे मंत्री उपस्थित होते.'आमच्याकडे पूर्ण बहूमत असून आम्ही सभापतीपदाची निवडणूक निश्चित जिंकणार आहोत. सरकारमधील आघाडीचे घटकपक्ष, अपक्ष आमच्यासोबत आहेत', असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. याचबरोबर पक्ष आणि घटकपक्ष, अपक्ष या सर्वांशी चर्चा करूनच पाटणेकर यांची सभापतीपदासाठी उमेदवार म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Intro:पणजी : गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे. त्यासाठी आज सत्ताधारी भाजपतर्फे आमदार राजेश पाटणेकर यांनी तर काँग्रेसकडून आमदार प्रतापसिंह राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

Body:तत्कालीन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर मागील 18 एप्रिलपासून हे पद रिक्त होते. याचा प्रभार उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे देण्यात आला होता.
पाटणेकर यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, बाबू आजगावकर, गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि विविध खात्याचे मंत्री उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, आमच्याकडे पूर्ण बहूमत असून आम्ही सभापतीपदाची निवडणूक निश्चित जिंकणार आहेत. सरकारमधील आघाडीचे घटकपक्ष, अपक्ष आमच्यासोबत आहेत. पक्ष आणि घटकपक्ष, अपक्ष या सर्वांशी चर्चा करूनच पाटणेकर यांची सभापतीपदाचा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.