लखनऊ (उत्तरप्रदेश) : ठाकूरगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. त्यामुळे नाराज असलेली पत्नी तिच्या माहेरच्या घरात राहत होती. शुक्रवारी पती पत्नी व मुलांना घेण्यासाठी माहेरी पोहोचला असता पत्नीने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला. यादरम्यान दोघांमध्ये भांडण वाढले आणि संतापलेल्या पत्नीने पतीची जीभ दाताने चावली. चावल्यानंतर त्याची जीभ लगेच तुकडा होऊन खाली पडली. अचानक झालेल्या या प्रकाराने पती जखमी होऊन तेथेच पडला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. यासोबतच आरोपी पत्नीला ताब्यात घेण्यात आले.
दोघांमध्ये झाले जोरदार वाद : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपूर्वी मुन्नाचा विवाह ठाकूरगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या सलमा नावाच्या तरुणीशी झाला होता. लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांमध्ये भांडणे होत होती. त्यामुळे सलमा आपल्या मुलांसह आईच्या घरी राहत होती. अनेकवेळा दोघांमध्ये सामंजस्य करार झाला, मात्र पत्नीने सासरच्या घरी जाण्यास नकार दिला. पती मुन्ना शुक्रवारी सकाळी मुलांना भेटण्यासाठी पत्नीच्या माहेरी गेला होता. पत्नीने मुलांना भेटण्यास नकार दिला, तेव्हाच मुन्नाने त्यांना भेटण्याचा हट्ट धरला. दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान, सलमाने रागाच्या भरात पतीची जीभ दाताने कापली. यानंतर मुन्ना जखमी होऊन तिथेच पडला.
अनेक वर्षांपासून सुरु होता वाद : एडीसीपी पश्चिम चिरंजीव नाथ सिंघा यांनी सांगितले की, पती-पत्नीमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. यामध्ये पत्नी पतीपासून विभक्त होऊन आपल्या मुलांसह आईवडिलांच्या घरी राहत होती. शुक्रवारी सकाळी पती मुलांना भेटण्यासाठी पत्नीच्या माहेरी गेला असता, वादात पत्नीने नवऱ्याची जीभ दाताने चावली, त्यामुळे संपूर्ण जीभ बाहेर आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. यासोबतच आरोपी पत्नीला ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला.
बलात्कारानंतर कापले गुप्तांग, स्तन आणि जीभ : दुसऱ्या एका घटनेत गेल्या वर्षी 11 नोव्हेंबर रोजी बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका मुलीला घरातून उचलून घेऊन जात तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. अत्याचारास आरोपींनी मुलीचे गुप्तांग, स्तन आणि जीभ कापली होती. तिच्यावर बलात्कार करून तिला घराजवळील बागेत बेशुद्धावस्थेत सोडले होते. बराच शोध घेतल्यानंतर बागेत मुलगी अर्धमेल्या अवस्थेत सापडली होती. त्यानंतर ग्रामस्थांकडून देणगी जमा करून मुलीवर उपचार करण्यात आले आहेत.