मुंबई - मुंबई पोलीस दलातील अधिकारी नंदकुमार गोपाळे व आशा कोकरे यांना अटक करण्यात आली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात ही अटक करण्यात आली आहे. श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी अधिकृत माहिती सीआयडी अधीक्षक मारुती जगताप यांनी दिली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या खंडणी प्रकरणात मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र केंद्रीय गुप्तचर संस्था सीआयडीने कारवाई केल्याचे समोर आले आहे. गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलीस निरिक्षक आशा कोकरे, पोलीस निरिक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके हे वांद्रे गुन्हे शाखा कक्ष 9 मध्ये कार्यरत होते.
श्यामसुंदर अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यामध्ये वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती आणि तपास करण्यात आला होता. त्यानंतर तेच प्रकरण महाराष्ट्र सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आले होते.
ठाण्यातील बिल्डर अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंह, पोलीस उपायुक्त अकबर पठाणसह पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता याप्रकरणी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना अटक केली आहे. याबाबतचे अधिकृत माहिती सीआयडी अधीक्षक मारुती जगताप यांनी दिली आहे.