सातारा : दहिवडी-फलटण मार्गावरील बालाजी पेट्रोल पंपावर गुरुवारी (दि. 9) रात्री दहाच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत रात्रपाळीवरील कर्मचार्यांकडील 21 हजारांची रोकड असलेली बॅग चोरून नेली. सातारा-दहिवडी-फलटण मार्गावरील बालाजी पेट्रोल पंपावर गुरुवारी (दि. 9) रात्री दहाच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत रात्रपाळीवरील कर्मचार्यांकडीलन 21 हजारांची रोकड असलेली बॅग चोरून नेली. या घटनेमुळे दहिवडी परिसरात खळबळ उडाली असून, या चोरीप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने चोरटे पंपावर आले : दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने चोरटे पंपावर आले. कर्मचार्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून दुचाकीवरून ते भरधाव निघून गेले. कर्मचार्यांनी संशयितांचा काही अंतर पाठलाग केला. तसेच गाडीचा नंबर लिहून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, नंबरप्लेटवरील अक्षरे पुसट असल्याने नंबर घेता आला नाही. तिन्ही चोरट्यांनी चेहर्यावर रूमाल बांधला होता. याप्रकरणी पेट्रोल पंप मालक उदयसिंह सुभाष जगदाळे (रा. दहिवडी, ता. माण) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू : घटनेची माहिती मिळताच दहिवडीचे सहायक निरीक्षक संतोष तासगावकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. तसेच पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीचे फुटेजही ताब्यात घेतले. फुटेजच्या आधारे संशयितांचा तपास सुरू केला आहे. बर्याच दिवसांपासून अनोळखी तीन-चार जणांना दहिवडी परिसरात फिरताना नागरिकांनी पाहिले आहे. त्यामुळे तेच संशयित असावेत, असा नागरीकांचा अंदाज आहे. मागील दोन महिन्यांत झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये याच संशयितांचा सहभाग असावा, अशी शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा : मुंबईत दरोडा टाकण्यासाठी दिल्लीहून आलेल्या तिघांना पिस्तुलांसह अटक