नाशिक : नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या केटीएच या नामांकित महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये टीवाय बी कॉम मध्ये शिकणाऱ्या ( Shocking Case of Suicide of a 21 Year Old Student ) एका 21 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा ( Renowned College Located in Gangapur Road Area of Nashik ) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गौरव रमेश बोरसे असे या तरुणाचे नाव असून, तो डांगसौंदाना सटाणा तालुक्यातील रहिवासी होता. या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली, हे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा : 22 नोव्हेंबर दुपारच्या सुमारास शेजारच्या रूम राहणारा एका मुलगा इस्त्री मागण्यासाठी गेल्यानंतर गौरवने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार गौरवने नैराश्यातून आत्महत्या केल्याची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती. गौरव हा आपल्या सीए असलेल्या मामाकडे पार्ट टाइम काम करीत होता. याबाबत अधिक तपास सरकारवाडा पोलीस करीत आहेत.