नवी दिल्ली : दिल्लीतील पीतमपुरा येथील स्पामध्ये काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. हा आरोप स्पा मालक आणि ग्राहकावर ( Spa owner and customer gangraped girl ) आहे. मुलीला मसाजसाठी स्पामध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मसाज करताना या लोकांनी तिला अंमली पदार्थ पाजून बेशुद्ध केले आणि आलटून- पालटून बलात्कार केला. ( Gang Rape in Delhi )
त्याचवेळी दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी याप्रकरणी ट्विट केले आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी व्यवस्थापक राहुल आणि ग्राहक सतीश कुमार यांना अटक केली आहे. मालीवाल यांनी ट्विट केले की, "स्पाच्या नावाखाली चुकीचे काम करून घेण्याचे रॅकेट खुलेआम सुरू आहे."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौर्या एन्क्लेव्ह पोलिस ठाण्याला शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही माहिती मिळाली. यानंतर पथकाने छापा टाकून मुलीची सुटका करून तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. यादरम्यान डीसीडब्ल्यूची टीमही पोहोचली.
सांगितले जात आहे की, मुलीला आधी सांगितले होते की, तिला फक्त महिलांची मसाज करायची आहे, मात्र नशा करून तिच्यावर बलात्कार केला जात होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना नोटीसही पाठवली आहे. त्यात त्यांनी अनेक मुद्यांवर उत्तरे मागितली आहेत.
हेही वाचा : Mathura Gangrape: सामूहिक बलात्कारानंतर पीडितेच्या पायावर चालवली मोटरसायकल.. पाय कापावा लागला