पुणे - पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर ( Social media ) रिअँक्शन व्हिडीओ ( Video) बनवते, म्हणून एका महिलेला तृतीयपंथी शिव लक्ष्मी आणि संगीता वानखेडे यांनी एका महिलेला चपलांचा हार गळ्यात टाकून मारहाण ( Beating ) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गावडे यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला ( Vishrantwadi Police Station ) बदनामी केल्याची तक्रार दिली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात एका महिलेला अश्या पद्धतीने मारहाण केल्याने सर्वच स्तरातून रोष व्यक्त होत आहे.
या संदर्भात विजया गावडे यांनी विश्रांतवाडी पोलिसात तक्रार दाखल केली - आईसाहेब नावाने युट्युब चालवून एक तृतीयपंथीय व्यक्ती स्वतःला महंत, मोठे थोर पुरुष घोषित करून, वयस्कर व्यक्तींना स्वतः चे पाया पडायला लावणे, पैसे मागणे यासारखे चुकीचे गोष्टी करायला लावणे, अंधश्रद्धा पसरविणे, या गोष्टी चॅनलवर प्रसारित करत होते. या गोष्टी चुकीचे असल्याने वरील गोष्टी चुकीचे असल्याबाबत विजया गावडे यांनी त्यांच्या मी विजया बारामतीकर या युट्युब चॅनेलवर व्हिडीओ बनवुन तो प्रसारित केला आहे. या संदर्भात त्या तृतीयपंथीयांनी चॅनलच्या सभासद असणाऱ्या महिलांना सांगितले आहे.
महिलांना मेसेज पाठवुन विजया बारामतीकर बदनामी करत असल्याची माहिती- बारामतीकर चॅनेलवर प्रसारित केलेल्या व्हिडीओतील माहिती पाहुन, शिवलक्ष्मी या तृतीयपंथीने तिच्या चॅनेलच्या सभासद असलेल्या इतर महिलांना मेसेज पाठवुन विजया बारामतीकर या चॅनेल कर्त्यांने तिची बदनामी करत असल्या बाबत माहिती दिली. त्यानंतर शिवलक्ष्मी यानी फोन करून, तिची बदनामी का करत आहे, अशी विचारणा गावडे यांना केली. मी कुणाची बदनामी करत नसुन, चुकीचे गोष्टी करु नका व समाजात अंधश्रद्धा पसरवु नका, असे गावडे यांनी सांगितले. यावर शिवलक्ष्मी यांना राग येवुन त्यांनी गावडे यांना माफी मागायला सांगुन माफी न मागितल्यास तुझ्या मुलाची बदनामी करण्याची धमकी दिली. ती मला त्रास देईल, म्हणुन मी शिवलक्ष्मी संजय झाल्टे ( वय - 35 ) रा. ह पारेगाव रोड, मुंडे कॉम्पलेक्स, ता. येवला, नाशिक यांचे घरी जावून गावडे यांनी माफी मागितली. या माफीची व्हिडीओ बनवुन शिवलक्ष्मी हीने तिच्या चॅनेलवर प्रसारित केले होते.
पुण्यात माफी मागावी अशी मागणी - त्यानंतर देखील त्यांचे समाधान न झाल्याने शिवलक्ष्मी हिने पुण्यात येवून सर्व महिला समक्ष पुण्यात माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर सर्व विषय संपून जाईल, असे वाटले. परंतु, 23 जून रोजी दुपारी 12 वाजता टिंगरेनगर, लेन नं १४. विश्रांतवाडी येथे हे सर्व जण आले. या ठिकाणी शिवलक्ष्मीचा पती संजय झाल्टे, शुभरा नावाचा किन्नर तसेच त्यांचे गाडीचा चालक असे सर्वजण आले होते. त्यांनी सांगितलं की भारतीताई यांच्या घरी भेटायचे आहे. मी त्यास होकार दिला आणि त्यांचे गाडीत बसले. काही अंतर गेल्यावर टिंगरेनगर जवळील महिला भारती सातव पत्ता श्रीस्वामी समर्थ, चौधरीनगर लेन कृ.०९. दिश्रांतवाडी, पुणे यांचे घराचे टेरीसवर घेवून गेले. गावडे यांना खुर्चीवर बसविले.
व्हिडीओ वरुन ट्रोल केल्यामुळे परिचयाच्या झालेल्या इतर महिला - चॅनेलवर टाकलेला शिवलक्ष्मी बाबतचा व्हिडीओ वरुन ट्रोल केल्यामुळे परिचयाच्या झालेल्या इतर महिला सागर पोपट शिंदे उर्फ शिवलक्ष्मी संजय झाल्टे, मोहिनी हजारे , आश्विनी जाधव, संजीवणी राणे, सोनाली, संगीता वानखेडे, शोभा मसुरकर तसेच शिवलक्ष्मी सहकारी नंदगिरी महाराज स्वमत नावाचा मुलगा असे एकामागे एक टेरेसवर आले. त्यानंतर या सगळ्यांनी गावडे यांना चॅनेलवर टाकलेल्या व्हिडीओ बाबत जाब विचारू लागले. माझी चुक झाली, मला माफ करा म्हणत असनाता शिवलक्ष्मी यांनी आरडा- ओरड करुन चपलांचा हार गावडे यांच्या गळयात घातला. सर्वांनी हाताने मारहाण करत त्याचा प्रसारण देखील केले आहे. सुमारे तासभर हे सगळ चालू होते. गळयात घातलेल्या चपलांचे हाराचे, मारहाणीचे वरील हजर असलेल्या सगळया महिलांनी त्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे.
हेही वाचा - Spiritual Leader Murder : अफगाणी धर्मगुरू खून प्रकरण; सुफी बाबाची माया अचंबित, पोलिसांची महत्त्वाची माहिती