ETV Bharat / crime

Cyber Crime: ओटीटीवर चित्रपट प्रदर्षित करण्याच्या नावाखाली निर्मात्याला 45 लाखांचा गंडा

author img

By

Published : Oct 20, 2022, 10:25 AM IST

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली सिनेमा क्षेत्राशी संबंधित असलेल्या टोळीने निर्मात्याची 45 लाखांची फसवणूक केली आहे. (producer cheated by 45 lakhs)

Cyber Crime
Cyber Crime

मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली सिनेमा क्षेत्राशी संबंधित असलेल्या टोळीने निर्मात्याची 45 लाखांची फसवणूक केली आहे. (producer cheated by 45 lakhs). या संबंधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई क्राईम ब्रँच (mumbai crime branch) उत्तर विभागाच्या सायबर पोलिसांनी त्या टोळीतील तीन आरोपींना अंधेरी ओशिवरा परिसरातून अटक केली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींपैकी एक लेखक आणि एक फिल्म दिग्दर्शक आहे.

मंगेश देसाई, साइबर पोलिस इंस्पेक्टर उत्तर विभाग

खोटा करार करून फसवले: यासंदर्भात क्राइम ब्रांच उत्तर विभागाच्या सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मानसिंग यांनी छापा एमडी ही वेब सिरीज तयार केली होती तिला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रमोशन आणि प्रदर्शित करण्यासाठी काही व्यक्तींची गरज असल्याची जाहिरात केली होती. ही जाहिरात पाहून संबंधित गुन्ह्यातील आरोपींनी मानसिंग यांच्याशी संपर्क साधला होता. या नंतर टोळीतील काही जणांकडून ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सिरीजचे प्रमोशन व प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे सांगण्यात आले. यासाठी त्यांच्यात एक करार देखील झाला होता. या करारासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या नावाचे लेटरहेड देखील वापरण्यात आले होते. मात्र तयार झालेली छापा एम डी फिल्म प्रदर्शित झाली नसल्याने फिर्यादीच्या मनात संशय बळावला. आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर मानसिंग यांनी याविषयीची तक्रार नोंदवल्यानंतर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलिसांच्या टीमने काही तांत्रिक बाबींचा तपास करून खात्री झाल्यानंतर तीन आरोपींना ओशिवरा अंधेरी परिसरातून अटक केली.

आरोपींना कोठडी: राजतकुमार मौर्या (२९) संजय शाह (३६) आणि राज उर्फ अक्षत सुलजा (४१) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे असून या गुन्ह्यात अजूनही काही आरोपी असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचं सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अटक केलेल्या तीन आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले. यापैकी दोघांना पोलीस कस्टडी आणि एका आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याचे सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.