मुंबई : मुंबई बोरिवली एमएचबी पोलिसांनी ( Mumbai Borivali MHB Police Arrested Woman ) बिल्किश खान (५२) नावाच्या महिलेला ( Accuse Bilkish Khan ) अटक केली आहे. ज्यांच्याकडून २३५ ग्रॅम गांजा (ड्रग्ज) जप्त करण्यात आला आहे. या महिलेला दहिसर पश्चिम येथील शिवाजीनगर परिसरातून अटक करण्यात आली आहे. ही महिला बराच काळ शाळकरी मुलांना ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती आहे.
२३५ ग्रॅम गांजा जप्त : एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर एपीआय सिद्धे यांनी कारवाई केली असून, छाप्यादरम्यान महिलेच्या घरातून २३५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही महिला शाळकरी मुलांना बोलावून अमली पदार्थ देत असे, असा आरोप फिर्यादीत आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून, तिच्याकडून ड्रग्जही जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.