नवी मुंबई - मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने ( Mumbai Directorate of Revenue Intelligence ) ३० सप्टेंबरला मेथॅम्फेटामाइन ( Methamphetamine ) बाबतची आजवरची सर्वात मोठी कारवाई करत 1476 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त ( Drugs worth Rs 1476 crore seized ) केले होते. या अमली पदार्थ तस्करीचे दक्षिण आफ्रिका कनेक्शन समोर ( South Africa connection to drug trafficking ) आले आहे. याप्रकरणी विदेशातून फळे आयात करणाऱ्या केरळमधील एका कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरला अटक करण्यात आली आहे.
मॅनेजिंग डायरेक्टर विगिन वर्गीसला अटक - दक्षिण आफ्रिका, ब्राझील, तुर्की आणि इतर देशांतून फळे आयात करणाऱ्या केरळमधील युम्मिट्टो इंटरनॅशनल फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने संबंधित संत्री आयात केली होती. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विगिन वर्गीस याला दोन दिवसांच्या चौकशीनंतर रविवारी रात्री अटक केली आहे. केरळमधील रहिवासी असलेला मन्सूर थचापरंबन याचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे वर्गीसच्या चौकशी नंतर डीआरआयच्या लक्षात आले. मन्सूर हा सध्या दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे असून तो मोर फ्रेश एक्सपोर्ट्स प्रायव्हेट नावाच्या कंपनीचा मालक आहे. करोना महामारी दरम्यान मास्क आयात करत असताना वर्गीस हा मन्सूरच्या संपर्कात आला.
निर्यात केल्यामुळे वर्गीसला चांगलाच नफा - करोना काळात मन्सूरने स्वस्तात संत्री निर्यात केल्यामुळे वर्गीसला चांगलाच नफा झाला. फळांच्या या व्यवसायात वर्गिसला ७० टक्के, तर मन्सूरला ३० टक्के नफा मिळायचा. त्यानंतर मन्सूरने वर्गीसला फोनवरून संत्र्यांची मोठी खेप येणार असल्याचे सांगत ते फ्रुट कंसाइन्मेंट राहुल नावाच्या व्यक्तीला देण्यास सांगितले. हेच ते कंसाइन्मेंट ज्यामध्ये मुंबईत आयात केलेल्या संत्र्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून डीआरआयने 1 हजार 476 कोटींचा मेथामफेटामाइन, कोकेनचा साठा जप्त केला होता.
ट्रकमध्ये ड्रग्सचा साठा - 30 सप्टेंबरला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील वाशी येथे हा ड्रग्स वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. ट्रक मधून अधिकार्यांना व्हॅलेन्सिया संत्र्यांच्या बॉक्समध्ये 198 किलो उच्च शुद्धतेचे क्रिस्टल मेथामफेटामाइन, 9 किलो कोकेन लपवल्याचे आढळले होते. संबंधीत ट्रक संत्र्यांचा माल भरून वाशी येथील प्रभु हिरा आईस अँड कोल्ड स्टोरेजमधून निघाला होता. दक्षिण आफ्रिकेतून हा माल मुंबईत आणण्यात आला होता. सीमाशुल्क विभागातून या संत्र्यांना मंजुरी मिळाल्यानंतर वाशी येथील शीतगृहामध्ये हा माल ठेवला गेला. ज्या मालामध्ये मोठ्याप्रमाणात ड्रग्सचाही साठा होता.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीचा सहभाग असल्याचा संशय डीआरआयला आहे. नवी मुंबई स्थानिक पोलिसांना मात्र या 1 हजार 476 कोटी रुपयांच्या अमली पदार्थ तस्करी आणि कारवाई प्रकरणाचा साधा मागमूसही नाही. ही डीआरआयची कारवाई असून आम्हाला काहीच माहिती नाही असे उत्तर पोलिसांनी दिले आहे.