ETV Bharat / crime

Nagpur Crime News : दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू प्रकरण, पोटात विष गेल्याने मृत्यू झाल्याची शक्यता - Police Superintendent

11 वर्षांपूर्वी मधुरीचे लग्न राजस्थान ( Rajasthan ) बरबटेकडी येथील फुलसिंग मीना यांच्या सोबत झाले होते. त्यांना 3 मुली आहेत. माधुरी सुमारे 2 महिन्यांपूर्वी तीनही मुलींना घेऊन माहेरी राहण्यासाठी आल्या होते. मंगळवारी सकाळी राधिका आणि साक्षीची तब्येत बरी नसल्याने, माधुरी यांनी दोघींना प्राथमिक आरोग्य केंद्रात ( Health Center ) आणले.

नागपूर गुन्हा
नागपूर गुन्हा
author img

By

Published : Jul 9, 2022, 11:59 AM IST

नागपूर - 5 जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील ( Nagpur District ) पाटणसावंगी येथे दोन सख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती.दोन्ही बहिणींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी मुलींच्या पोटात विष गेल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक ( Police Superintendent ) विजयकुमार मगर यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात शवविच्छेदन आणि विसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच या बाबत ठोस माहिती देता येईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. ( Nagpur Crime Latest News )

नागपूर गुन्हा

2 महिन्यांपूर्वी तीनही मुलींना घेऊन माहेरी राहण्यासाठी आल्या - साक्षी फुलसिंग मीना (वय- 6) आणि राधिका फुलसिंग मीना (वय - 3) असे मृत्यू झालेल्या दोनही चिमुकल्यांचे नावं आहे. साक्षी आणि राधिका यांची आई मधुरीचे महेर मूळचे पाटणसावंगी येथील आहे. 11 वर्षांपूर्वी मधुरीचे लग्न राजस्थान ( Rajasthan ) बरबटेकडी येथील फुलसिंग मीना यांच्या सोबत झाले होते. त्यांना 3 मुली आहेत. माधुरी सुमारे 2 महिन्यांपूर्वी तीनही मुलींना घेऊन माहेरी राहण्यासाठी आल्या होते. मंगळवारी सकाळी राधिका आणि साक्षीची तब्येत बरी नसल्याने, माधुरी यांनी दोघींना प्राथमिक आरोग्य केंद्रात ( Health Center ) आणले. तेव्हा डॉक्टरांनी राधिकाला तपासून मृत घोषित केले, तर साक्षीला उपचारासाठी नागपूरला ( Nagpur ) पाठवले असता वाटेत तिचा मृत्यू झाला होता.

घातपाताची शक्यता? - सोमवारी रात्री व्यवस्थित झोपी गेलेल्या साक्षी आणि राधिका सकाळी उठल्यानंतर अचानक मृत्यू होण्यामागे घातपात तर नाही, अशी शंका पोलिसांना आहे. मात्र, प्राथमिक तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार दोन्ही मुलींच्या पोटात विषजन्य पदार्थ गेले असावेत. त्यांना फूड पॉयझन झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असू शकतो अशी शक्यता पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळणार; सचिन अहिर यांचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.