नागपूर : नागपूर शहरात रविवारी दमदार पावसाने हजेरी ( Nagpur rains update ) लावली. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. नागपूर शहराशेजारी ( Heavy Rains in Nagpur ) असलेल्या हिंगणा येथील भीमनगर इसासनीच्या नाल्याला रात्री आलेल्या पुरात ( Increased Water Level of Rivers and streams ) आई व मुलगी अशा दोघीही वाहून ( Mother and Daughter carried away in water ) गेल्या. सुकवन राधेलाल मातरे (४२) आणि त्यांची १७ वर्षीय मुलगी अंजली राधेलाल मातरे असे वाहून गेलेल्यांचे नाव आहे. यापैकी सुकवन यांचा मृतदेह ( Sukwan's body was found ) घराच्या काही अंतरावर आढळून आला आहे, तर त्यांची मुलगी अंजलीचा शोध घेतला जातो आहे.
पूर्ण शहरात साचले होते पाणी : नागपुरात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूरच्या पडोळे चौकात रिंगरोडवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक ( Nagpur traffic update ) बंद पडली. खोलगट भाग असल्याने पडोळे चौकातून प्रतापनगरच्या दिशेने जात असलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला
तरुण धावले मदतीला - अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. वाहन चालकांना अडचण येऊ नये म्हणून नागपुरातील अनेक नागरिक विशेषतः तरुण भर पावसात मदतीसाठी बाहेर पडल्याचे चित्र पहायला मिळाले. एका बाजूची वाहतूक बंद करत येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना रस्ता दाखवत मार्ग काढून देण्याचे काम स्थानिक तरुणांनी रस्त्यावर उतरून केले. दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यावर नागपुरातील रस्त्यांवर हेच चित्र बघायला मिळते. यंदाही या परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही.
दमदार पावसाने नदी-नाल्यांची पाणी पातळीत वाढ : काल दिवसभर आणि रात्री नागपूरसह संपूर्ण जिल्ह्यात दमदार पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच नदी-नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे, तर काहींना पूर आलेला आहे. हिंगणा येथील भीमनगर इसासनीच्या नाल्याचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते. त्याच वेळी सुकवन आणि त्यांची मुलगी अंजली ह्या घराबाहेर पडल्या असता, तोल जाऊन त्या पाण्यात पडल्या असाव्यात, असा कयास लावला जात आहे.
मृतदेह आढळल्यानंतर घटना आली उघडकीस : आज सकाळी सुकवन राधेलाल मातरे यांचा मृतदेह घरापासून काही अंतर दूर पडलेला दिसून, आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती समजताच हिंगणा पोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अंजलीला शोध घेतला जातो आहे.
हेही वाचा : नागपूरला मुसळधार पावसाने झोडपले, अनेक घरात शिरले पावसाचे पाणी
हेही वाचा : नागपुरात पावसाची हजेरी, वातावरणात गारवा