ETV Bharat / crime

महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर अतिरेक्यांची असते कायमच वाकडी नजर

author img

By

Published : Aug 18, 2022, 5:08 PM IST

परराष्ट्रांसोबत होणारी सागरी वाहतूक आणि भारतीय नौदलाच्या Indian Navy दृष्टीने महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मुंबईवर 2009 साली झालेल्या 26/11 च्या Mumbai Terror attack हल्ल्यापासूनच नव्हे तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वीपासून राज्याचा समुद्र किनारा संवेदनशील मानल्या गेला आहे. त्या काळातील परकीय आक्रमणकारी असो वा 26/11च्या घटनेतील अतिरेकी या सर्वांची राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर कायमचीच वाकडी नजर राहिली आहे. रायगडमध्ये गुरुवारी शस्त्रसाठा असलेल्या दोन संशयित बोटी पकडल्या गेल्याने suspicious boat found in Raigad राज्याची सागरी सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे.

Mumbai Terror attack
रायगडमध्ये संशयित बोट आढळली

मुंबई परराष्ट्रांसोबत होणारी सागरी वाहतूक आणि भारतीय नौदलाच्या Indian Navy दृष्टीने महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मुंबईवर 2009 साली झालेल्या 26/11 च्या Mumbai Terror attack हल्ल्यापासूनच नव्हे तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वीपासून राज्याचा समुद्र किनारा संवेदनशील मानल्या गेला आहे. त्या काळातील परकीय आक्रमणकारी असो वा 26/11च्या घटनेतील अतिरेकी या सर्वांची राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर कायमचीच वाकडी नजर राहिली आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन मानले जाणाऱ्या मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 197 नागरिक बळी पडले होते. तर सुमारे 600 नागरिक जखमी झाले होते. त्यावेळी मुंबई पोलीस दलातील महत्त्वाचे अधिकारी दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद झाले.

26/11 च्या कटू आठवणी पुन्हा ताज्या रायगडमध्ये गुरुवारी शस्त्रसाठा असलेल्या दोन संशयित बोटी पकडल्या गेल्याने Suspicious boat found in Raigad राज्याची सागरी सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे. सुरक्षा यंत्रणेकडून ताब्यात घेण्यात आलेली बोट ओमान सिक्युरिटीजची असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने एटीएसचे पथक रायगडमध्ये दाखल झाले आहे. तसेच कोंकणचे आयजी मोहिते घटनास्थळी पोहोचले आहे. बोटीला किनाऱ्यावर आणण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविले जात आहे. मात्र सापडलेल्या बोटीत कोणीही नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंबईवर हल्ला करणारे 26/11च्या घटनेतील अतिरेकी सागरी मार्गानेच आहे असल्याने सागरी सुरक्षा यंत्रणा कायमची हाय अलर्टवर असते. याचाच परिणाम म्हणजे या यंत्रणांनी रायगडमध्ये तातडीने कारवाई करून दोन संशयित बोटींना ताब्यात घेतले. पण या घटनेने मुंबईसह राज्यातील लोकांच्या 26/ 11च्या आठवणी ताज्या झाल्या. त्यावेळेस नेमके काय घटले होते त्यावर नजर टाकूया.

मुंबईतील त्या वृत्तपत्राची बातमी ठरली खरी मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याच्या वेळेस विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री तर आर आर पाटील हे गृहमंत्री होते. 2009 साली मुंबईतील एका कमी खप असलेल्या वृत्तपत्राच्या पत्रकाराने राज्यात समु्द्रीमार्गे अतिरेकी हल्हा होण्याची शक्यता असल्याचे वर्तविले होते. याबाबत राज्य गृहमंत्रालयाला बातमीसह कळविण्यात आले होते. मात्र छोट्या वृतपत्राने केवळ प्रसिद्धीसाठी छापलेली पोकळ बातमी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर या हल्ल्यानंतर ती बातमी खरी ठरली.

खालील टॉप 5 ठिकाणं दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती.

1) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) मुंबईतील हे सर्वात गर्दीचे रेल्वे स्टेशन आहे. 26 नोव्हेंबरला लिओपोल्डवर हल्ला सुरू असतानाच दहशतवाद्यांच्या दुसऱ्या एका गटाने सीएसटीतही गोळीबार सुरू केला. या रेल्वे स्टेशनवरून त्या दिवशीही आपापल्या ठिकाणांवर जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी केली होती. या गर्दीलाच लक्ष करत दोन दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या ठिकाणी 58 लोकांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास 100 हून अधिक जण यात जखमी झाले होते.

2) हॉटेल ऑबेरॉय ट्रायडेंटलिओपोल्ड कॅफे, सीएसटीवरच्या हल्ल्याची तीव्रता कळेपर्यंत दहशतवाद्यांनी ऑबेरॉय हॉटेलमधेही गोळीबार सुरू केला. व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या या हॉटेलमध्ये त्यादिवशी जवळपास साडेतीनशेहून अधिक नागरिक हजर होते. यावेळी दहशतवाद्यांनी हॉटेलमधल्या लोकांना ओलिस ठेवले होते. येथे एनएसजीच्या कमांडोंनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. याठिकाणी 30 जणांचा मृत्यू झाला होता.

3) हॉटेल ताज गेट वे ऑफ इंडियाजवळच्या ताज हॉटेललाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. समुद्राशेजारच्या या हॉटेलमधल्या घातपातानंतरच या हल्ल्याची जगाला तीव्रता कळाली. नंतर ताज हॉटेलमधून धुराचे लोळ दिसू लागले होते. परदेशी पर्यटक, अधिकारी या हॉटेलमध्ये होते. ताज हॉटेलमधल्या या हल्ल्यात ३१ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच पोलिसांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला.

4) छाबडा हाऊस दोन दहशतवाद्यांनी नरीमन पॉइंट येथील ज्यूंचे प्रार्थनास्थळ छाबडा हाऊस ताब्यात घेतले. अनेकांना ओलिस ठेवले होते. कित्येक तासांच्या चकमकीनंतर एनएसजी कमांडोंनी दहशतवाद्यांचा याठिकाणी खात्मा केला. येथील इमारतीवर हॅलिकॉप्टरद्वारे एनएनसजी कमांडोंना उतरवण्यात आले. नंतर या कमांडोंनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले.

5) लिओपोल्ड कॅफे परदेशी पर्यटकांची रेलचेल असलेल्या लिओपोल्ड कॅफेवर दहशतवाद्यांनी पहिल्यांदा गोळीबार केला. काही कळण्याच्या आधीच दहशतवाद्यांनी येथे गोळीबार करून तिथून ते पळून गेले. लिओपोल्ड कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारात १० जण मारले गेले.

अतिरेक्यांनी सर्वांत आधी केली मासेमाराची हत्या पाकिस्तानून समुद्री मार्गे आलेल्या अतिरेक्यांनी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचताच एका मासेमाराची गळा कापून क्रूर हत्या केली होती. मुंबईला वेठीस धरणाऱ्या या अतिरेक्यांपैकी अजमल कसाब नावाच्या अतिरेक्याला तुकाराम ओंबळे नावाच्या पोलिसाने गोळीबार झेलत जिवंत पकडले होते. त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला फासावर लटकविण्यात आले. पण आजही समुद्र किनाऱ्यावर संशयित बोट किंवा जहाज सापडल्याची बातमी झळकली की देशाच्या आर्थिक राजधानीत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या होतात.

हेही वाचा Devendra Fadnavis हरिहरेश्वरमधील संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची, उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.