ETV Bharat / crime

International Anti-Corruption Day : सोलापुरात लाच घेण्यात पोलीस खाते अव्वल; दोन वर्षांत 74 जणांना लाच घेताना अटक

एकीकडे सर्वत्र भ्रष्टाचार वाढत चालला असताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Solapur Anti Corruption Department) दोन वर्षात ७४ जणांना लाच घेताना अटक केली आहे. लाच घेताना पकडलेल्यांमध्ये पोलिसांची संख्या मोठी आहे. ९ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिवस (International Anti-Corruption Day) असल्याने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा घेतलेला हा विशेष आढावा.

अँटी करप्शन
अँटी करप्शन
author img

By

Published : Dec 9, 2021, 3:56 PM IST

सोलापूर- आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिवस (International Anti-Corruption Day) हा जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने समाजातून भ्रष्टाचार संपवण्यासाठी काही न काही जनजागृती केली जात आहे. भ्रष्टाचार हा सामाजिक व राजकीय स्तरावर प्रभाव टाकतो. या दिवसाचे औचित्य साधून ईटीव्ही भारतने भ्रष्टाचाराच्या घटनांचा उहापोह केला. गेल्या दोन वर्षात सोलापुरातील अँटी करप्शन खात्याने (Solapur Anti Corruption Department) पोलिस खात्यात असलेल्या लोकसेवकांना लाच घेताना अटक केले आहे. शहर आणि जिल्ह्यात 53 ठिकाणी कारवाई झाली असून 74 संशयितांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस (Solapur City and Rural Police) दलात एकूण 11 कारवाया झाल्या असून 15 संशयित पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
डिसेंबर 2019 मध्ये अँटी करप्शनची सापळा कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डिसेंबर 2019 मध्ये सोलापुरात एकूण सहा कारवाया केल्या. त्यामध्ये महसूल विभागात 2 कारवाया झाल्या व 4 संशयित आरोपींना अटक झाली. पोलीस खात्यात एक कारवाई झाली व एका संशयितास लाच घेताना अटक झाली. भूमी अभिलेख कार्यालयात एक कारवाई झाली, त्यात तीन संशयितांना लाच घेताना अटक झाली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात (Education Department of Zilla Parishad) एक कारवाई झाली आणि एका संशयितास अटक झाली. बाजार समितीमध्ये एक कारवाई झाली व एका संशयिताला लाच घेताना रंगेहाथ अटक झाली. डिसेंबर 2019 मध्ये सोलापुरात एकूण 6 कारवाया झाल्या आणि 10 संशयितांवर कारवाई झाली. या सर्व प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

2020 मध्ये 25 कारवाया, 34 जणांना अटक झाली
अँटी करप्शन सोलापूर युनिटने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एकूण 25 कारवाया केल्या. त्यामध्ये 34 जणांना लाच घेताना अटक झाली आहे. महसूल विभागाच्या संशयित आरोपी लोकसेवकांवर 6 संशयितांना लाच घेताना अटक झाली आहे. अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी महसुल खात्यात एकूण 4 कारवाया केल्या होत्या. भूमी अभिलेख विभागात 3 कारवाया केल्या आणि 4 जणांना अटक केली. पोलीस खात्यात 3 ठिकाणी कारवाया झाल्या आणि 3 जणांना लाच घेताना अटक झाली. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ विभागात 3 कारवाया आणि 3 आरोपी अटक. जिल्हा परिषद आरोग्य विभाग 1 कारवाई आणि 1 आरोपी अटक. महाराष्ट्र रस्ते विकास संस्था 1 कारवाई 2 संशयित आरोपी अटक. सोलापूर महानगरपालिका कारवाई 1 आणि आरोपी 1. खाजगी इसम कारवाई 2 आरोपी 3. कृषी खात्यात कारवाई 1 व आरोपी 1. पंचायत समिती कारवाई 1 आणि आरोपी 1. अशाप्रकारे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 25 कारवाया झाल्या असून, 34 संशयितांना लाच घेताना अटक झाली आहे.
2021 मध्ये सोलापूर पोलीस खात्यात सर्वाधिक कारवाया
अँटी करप्शन सोलापूर युनिट कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एकूण 22 ठिकाणी अँटी करप्शनच्या कारवाया झाल्या. त्यामध्ये शहर आणि ग्रामीण पोलिसां दलात 7 ठिकाणी कारवाई झाली असून 11 संशयित पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. राज्य कर विभाग कारवाई 1 व आरोपी 1.ग्रामपंचायत कारवाई 3 आणि आरोपी 5.जिल्हा परिषद कारवाई 2 आरोपी 2.शिक्षण संस्था कारवाई 1 आरोपी 2.शासकीय तंत्रनिकेतन कारवाई 1 आरोपी 1.नगरपंचायत कारवाई 2 आरोपी 2.सोलापूर महानगरपालिका कारवाई 1 व 2 संशयीत कर्मचारी अटक. आरोग्य विभाग कारवाई 1 व लाच घेताना अटक आरोपी 1.महसूल खात्यात कारवाई 1 व अटक आरोपी एक, असे विविध ठिकाणी अँटी करप्शन विभागाच्या अधिकारी- कर्मचारी यांनी नजर ठेवून प्राप्त तक्रारीनुसार 22 ठिकाणी कारवाया केल्या आणि 30 संशयित लोकसेवकांना लाच घेताना बेड्या ठोकल्या.
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिवस इतिहास

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवसाचा इतिहास (History of International Anti-Corruption Day) 31 ऑक्टोबर 2003 पासून सुरू झाला. जेव्हा संयुक्त राष्ट्र महासभेने भ्रष्टाचारविरोधात संयुक्त राष्ट्राचे संमेलन सुरू केले (When the United Nations General Assembly launched the United Nations Convention against Corruption) होते. तेव्हा पासून 9 डिसेंबर हा दिवस भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवसाचे महत्व हे भ्रष्टाचार विरोधातील लढाईला जागतिक स्तरावर गती देणे आहे. लोकशाही संस्थांचा पाया कायम ठेवण्यासाठी भ्रष्टाचाराला मुळापासून उखडून टाकणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक देशांचा आर्थिक विकास झालेला नाही. संयुक्त राष्ट्राच्या आकड्यानुसार 1 ट्रेलियन डॉलर लाच म्हणून दिली जाते तर, 2.6 ट्रीलियन डॉलर लाच भ्रष्टाचाराद्वारे घेतली जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.