ETV Bharat / crime

Son Killed Father In Kosari : मुलाने घातला वडिलाच्या डोक्यात राॅड; जत तालुक्यातील प्रकार

जत तालुक्यातील कोसारी गावात ( Murder in Kosari village of Jat taluka ) पित्याने दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने वडिलांची हत्या ( Son killed father in Kosari ) केली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. आप्पासाहेब कृष्णा तोरवे असे मृत सेवा निवृत्त वडिलाचे नाव आहे.या प्रकरणी संशयित दारुडा मुलगा प्रमोद तोरवे यास जत पोलिसांनी अटक केली आहे.

Son Killed Father In Kosari
कोसारी गावात हत्या
author img

By

Published : Sep 4, 2022, 8:57 AM IST

सांगली - दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याने एका मुलाने वडिलांचा खून ( Son killed his father in Kosari ) केल्याचा धक्कादायक प्रकार जत तालुक्यातल्या कोसारी ( father Killed at Kosari in Jat taluka of Sangli district ) येथे घडला आहे.आप्पासाहेब कृष्णा तोरवे असे मृत सेवा निवृत्त वडिलाचे नाव आहे.या प्रकरणी संशयित दारुडा मुलगा प्रमोद तोरवे यास जत पोलिसांनी अटक केली आहे. तर वडिलांच्या खुनाच्या आधी आईलाही मारहाण ( Son beat mother in kosari ) केल्याने भीतीने आईने पळ काढल्याने आई बचावली आहे.

वडीलांच्या डोक्यात घातले लोखंडी स्टॅन्ड - जत तालुक्यातील कोसारी येथे आप्पासाहेब कृष्णा तोरवे,वय 60 हे सेवानिवृत्त सैनिक राहत होते. त्यांना प्रमोद हा मुलगा आहे. प्रमोदला दारूचे व्यसन असून,दारु पिण्यासाठी वडिलांकडे तो पेन्शनचे पैसे मागत होता. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने शुक्रवारी रात्री प्रमोद हा दारू पिऊन घरी आला. त्याने वडील आप्पासाहेब यांच्याकडे दारू पिण्यासाठी पेंशनच्या पैशाची परत मागणी करू. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला,त्यामुळे प्रमोद याने वडिलांच्या सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यातून रागाच्या भरात प्रमोद याने वडीलांच्या डोक्यात घरातील लोखंडी स्टॅन्ड घातले,ज्यामध्ये आप्पासाहेब यांचा मृत्यू झाला.

आईला देखील मारहाण - शनिवारी सकाळी प्रमोद दारूच्या नशेत असतांना आता एकाला मारले आहे,आणखी एकाला मारणार आहे,असे बोलु लागला. त्याचे शब्द भावकीतील लोकांनी ऐकल्यानंतर प्रमोद तोरवे याच्या घरी जाऊन बघताच आप्पासाहेब तोरवे हे मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. दरम्यान शुक्रवारी दुपारी दारुसाठी आई ललिता तोरवे हिला देखील मारहाण करण्यात आली होती. आई ललिता तोरवे या आपला जीव वाचवून पळून जाऊन कुंभारी येथे बसस्थानकात थांबल्या होत्या. त्यामुळे त्या बचावल्या आहेत. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित प्रमोद तोरवे याला जत पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा - Akola Shiv Sena Leader Murder : अकोल्यात शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची हत्या, मृतदेह तलावात फेकला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.