मुंबई - प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट ( Film director Mahesh Bhatt ) यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीचा ( Underworld don Ravi Pujari ) साथीदार गँगस्टर ओबेद रेडिओवाला ( Gangster Obed Radio ) याला मुंबई उच्च न्यायालयाकडून ( Bombay High Court ) जामीन मंजूर करण्यात आला आहे. ओबेद रेडिओवाला वर अनेक गुन्हेगारी संदर्भातील गुन्हे दाखल आहे या प्रकरणातील 10 आरोपींना यापूर्वीच मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ( MCOCA) न्यायालयाने 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती.
अमेरिकेत अटक - बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक करीमा मोरानी ( Film director Karima Morani ) यांच्यावर 2014 मध्ये गोळीबार, तसेच चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी ओबेद रेडिओवाला याला अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आले होते. रेडिओवाला यांना अमेरिकेतच अटक करण्यात आली होती. देशात बेकायदेशीरपणे राहिल्याबद्दल सप्टेंबर 2017 पासून ते युनायटेड स्टेट्स इमिग्रेशन, कस्टम एन्फोर्समेंटच्या ताब्यात होता.
2014 मध्ये भट्ट यांच्या हत्येचा कट - या प्रकरणी एकूण 13 जणांना अटक झाली होती. या सर्व आरोपींवर हत्येचा कट रचणे, शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत खटला चालवण्यात आला हाेता. मात्र इतर तिघांची पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता करण्यात आली. 2014 मध्ये भट्ट यांच्या हत्येचा कट रचण्यात आला हाेता. मात्र, पाेलिसांनी ताे उधळून लावत आराेपींना अटक केली हाेती. या प्रकरणात 10 गुंडांना मुंबई सत्र न्यायालयाने प्रत्येकी 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. इशरत, अझीम, अश्फाक, आसिफ, शाहनवाज़, फिरोज, शब्बीर, रहीम आणि अनीस अशी आराेपींची नावे होती.
या 10 आरोपींविरोधात मुंबई पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहे. MCOCA अंतर्गत, ओबेद रेडिओवाला यांच्यावर खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट, खंडणी, फसवणूक, चोरी, किडनॅपिंग आणि एक संघटित गुन्हेगारी सिंडिकेट तयार करण्यासाठी इंटरनेट वापरणे यासह अनेक आरोप ठेवण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती ज्यात रेडीओवाला त्याच्याविरुद्ध मुंबईत दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांमध्ये कायद्याला सामोरे जावे यासाठी त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.
हेही वाचा - Independence Day ध्वजारोहणाची जबाबदारी मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांवर