ETV Bharat / crime

Woman Ganggraped: दारू पाजून महिलेची इज्जत लुटली, विरोध करताच 'प्रायव्हेट पार्ट'मध्ये काचेची बाटली घातली.. गुन्हा दाखल - Gangrape with women in Banda

उत्तरप्रदेशात सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला अन् तिच्या पतीला दारू पाजल्यावर दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिने त्याला विरोध केला असता तिच्या 'प्रायव्हेट पार्ट'मध्ये काचेची बाटली घुसवण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. Gangrape in UP

GANGRAPE WITH WOMEN IN BANDA PUT GLASS BOTTLE IN PRIVATE PART
दारू पाजून महिलेची इज्जत लुटली, विरोध करताच 'प्रायव्हेट पार्ट'मध्ये काचेची बाटली घातली.. गुन्हा दाखल
author img

By

Published : Jan 15, 2023, 1:50 PM IST

बांदा (उत्तरप्रदेश): बांदा जिल्ह्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून निर्दयीपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. येथे एका महिलेवर दोन जणांनी बलात्कार केला. त्याचवेळी विरोध केल्याने तिसऱ्या व्यक्तीने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काचेची बाटली टाकली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून दोन आरोपींना अटक केली. महिलेच्या आरोपाच्या आधारे घटनास्थळावरून दोन आरोपींना अटक करण्यात आली.

असा झाला अत्याचार: पीडित महिलेने सांगितले की, ती पतीसोबत दुचाकीने गावी जात होती. त्यांच्यासोबत त्यांच्याच गावातील आणखी 3 लोक दुसऱ्या दुचाकीवरून जात होते. तेव्हा वाटेत या लोकांनी महिलेला आणि महिलेच्या पतीला दारू पाजली. दारू प्यायल्यानंतर महिलेचा पती आणि महिलेला नशा चढली. त्यानंतर त्यांनी महिलेच्या पतीला सिगारेट घेण्यासाठी पाठवले. पतीने तिला एकटी सोडल्यावर दोन लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. त्याचवेळी महिलेने विरोध केला असता तिसऱ्या व्यक्तीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काचेची बाटली घातल्याने तिला दुखापत झाली आहे.

पोलीस पोहोचले घटनास्थळी: देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्कार करून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. येथे शनिवारी रात्री उशिरा एका महिलेवर दोघांनी बलात्कार केला. त्याचवेळी विरोध करत तिसऱ्या व्यक्तीने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काचेची बाटली टाकली. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले. लोकांनी पोलिसांना माहिती घटनेची दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक लक्ष्मी निवास मिश्रा यांनी सांगितले की, देहात कोतवाली भागात एका महिलेवर बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा तपास करण्यात आला. तपासात असे आढळून आले आहे की महिला आणि तिच्या पतीसह इतर सर्व लोकांनी मद्य प्राशन केले होते आणि जे उपस्थित होते त्यांनी त्याच्याशी छेडछाड केली होती, त्यावरून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेतील बलात्काराशी संबंधित पुरावे तपासात मिळालेले नाहीत. त्याचबरोबर पुढील कार्यवाही सुरू आहे.

सगळेच होते दारूच्या नशेत: देहात कोतवाली परिसरात शनिवारी सायंकाळी उशिरा एका निर्जन भागातून महिलेचा आवाज ग्रामस्थांना ऐकू आला. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी पाहिलं की, तिच्यासोबत एक महिला आणि इतर काही लोक दारूच्या नशेत होते. महिलेने घडलेला प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली आणि महिलेची चौकशी केली. महिलेने आपल्यासोबत झालेल्या बलात्कार आणि अत्याचाराबाबत पोलिसांना सांगितले.

हेही वाचा: गरोदर महिलेला बसस्थानकातून पळवून नेत चार दिवस केला गँगरेप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.