ETV Bharat / crime

Chargesheet in Court by Cyber Police : बीटकाॅईन गुन्ह्यातील आरोपीं विरोधात दोषारोपत्र न्यायालयात दाखल; सहा कोटींची क्रिप्टो करन्सी जप्त

author img

By

Published : Jun 7, 2022, 6:01 PM IST

बीटकाॅईन गुन्ह्यात (Bitcoin Crime) अटक करण्यात आलेला आराेपी माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील (Former IPS Officer Ravindra Patil) आणि सायबर तज्ञ पंकज घोडे (Cyber expert Pankaj Ghode) यांच्या विरोधात पुणे सायबर पोलिसांनी न्यायालयात चार हजार ४०० पानी दोषारोपपत्र दाखल (Chargesheet in Court by Cyber Police) केले आहे. याबाबत एकूण २५ साक्षीदार यांचे जबाब पोलिसांनी जबाब नोंदवले आहे. पाटील याच्याकडील चौकशीत पोलिसांनी त्याच्या ताब्यातून विविध ३४ प्रकारची सहा काेटी रुपयांची क्रिप्टाेकरन्सी जप्त केली आहे. (Cryptocurrency of Rs Six Crore Seized)

Bitcoin cryptocurrency
बिटकाॅईन क्रिप्टो करन्सी

पुणे : बीटकाॅईन गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आराेपी माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील आणि सायबर तज्ञ पंकज घोडे यांच्या विरोधात पुणे सायबर पोलिसांनी न्यायालयात चार हजार ४०० पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. याबाबत एकूण २५ साक्षीदार यांचे जबाब पोलिसांनी जबाब नोंदवले आहे.

चौकशीत आढळली सहा कोटींची क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर : पाटील याच्याकडील चौकशीत पोलिसांनी त्याच्या ताब्यातून विविध ३४ प्रकारची सहा काेटी रुपयांची क्रिप्टाेकरन्सी जप्त केली आहे. पाटील याने त्याचे कुटुंबीय व नातेवाईक यांच्या नावावर क्रिप्टाे करन्सीचे वाॅलेट काढून त्यात आराेपींच्या खात्यातून बीटकाॅईन वर्ग केल्याची बाब ही तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी त्याची पत्नी आणि भाऊ यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पुणे पोलिसांकडून सायबर तज्ञ म्हणून केली नेमणूक : पुणे पोलिसांकडे सन २०१७ मध्ये अमित भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांचे विरोधात दत्तवाडी व निगडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बिटकॉईनच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांकडून सायबर तज्ञ म्हणून रवींद्र पाटील आणि पंकज घोडे हा काम करीत होता. मात्र, यादरम्यान त्यांनी सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास करताना, आरोपींच्या खात्यावरील क्रिप्टो करन्सी परस्पर इतर खात्यात वळविल्याचे तसेच खात्यावर कमी बीटकॉईन असल्याचे स्क्रीनशॉट दाखविल्याचे केवायसीच्या रिपोर्टमधून दिसून आले आहे. आतापर्यंत रवींद्र पाटील याने २३६ बीटकॉईन इतरत्र वळविल्याचे ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा : Bitcoin: मोठ्या उलढालीनंतर क्रिप्टो मार्केट सुरू; वाचा सविस्तर काय आहेत स्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.