जळगाव - शहरातील शिवाजी नगरमधून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या माया दिलीप फरसे ( वय ५१ ) या महिलेचा सोमवारी जळगाव तालुक्यातील विदगाव शिवारातील जंगलात मृतदेह मिळून आला आहे. जादुटोण्याच्या प्रकारातून महिलेला जाळण्याचा प्रयत्न करुन, तिला मारहाण करत दोन जणांनी तिचा खून ( Black Magic Murder Jalgaon ) केला. याप्रकरणी पोलिसांनी संतोष रामकृष्ण मुळीक (वय ३०, रा. शिवाजी नगर) या मांत्रिकासह महिलेचा चुलत भाचा अमोल रतनसिंग दांडगे (वय २७, रा.शिवाजी नगर) या दोन जणांना ताब्यात घेतले ( Niece burned Aunt ) आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
दोन दिवस उलटूनही महिलेचा शोध लागत नसल्याने पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड ( PI Vijaykumar Thakurwad ) यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक अरुण सोनार, पोलीस उपनिरिक्षक सर्जेराव क्षीरसागर, रतन गिते व भास्कर ठाकरे यांनी सोमवारी शिवाजी नगरातील फुटेज तपासले असता, माया ह्या त्यांचाच चुलत भाचा असलेल्या अमोल दांडगे याच्यासोबत जात असल्याचे दिसून आले. त्यांच्या एका हातात पिशवीही होती. हे फुटेज माया यांच्या पतीला दाखविले असता, त्यांनी दोघांना ओळखले. सीसीटीव्ही फुटेज आधारावरुन रतन गिते व भास्कर ठाकरे यांनी सर्वात आधी, सीसीटीव्हीत फुटेजमध्ये महिलेसोबत दिसून येणार्या अमोल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मांत्रिक संतोष मुळीक याची माहिती मिळाल्यावर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
..तर पैशांचा पाऊस पडेल
सुरुवातीला ताब्यात घेतलेल्या दोघांनी खून केल्याचे कबूल करायला नकार दिला. दोघांना खाकीचा हिसका दाखविल्यावर त्यांनी घटनेची कबूली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष दांडगे हा मंत्रोपचार करतो. त्याच्या घरात हेच साहित्य मिळून आले. महिलेचा बळी दिला तर पैशाचा पाऊस पाडता येईल व त्यातून आपल्याला खूप पैसे मिळतील, असे संतोष याने अमोल याला सांगितले होते. त्यानुसार अमोल माया यांना घेऊन गेला होता. घनदाट झुडपात जाळल्यानंतर खोल खड्डयात या महिलेचा मृतदेह टाकून देण्यात आल्याचे समोर आले आहे.