धुळे - शहरातील साक्री रोड येथील राजीव गांधी नगरात गुरुकुल हायस्कूलच्या मागे राहत असलेल्या रविंद्र काशिनाथ पगारे या तरुणाचा खून झाला ( Murder In Dhule ) आहे. मयत रवींद्र पगारे यांच्या भावाचे घर भाड्याने मागितले असता, ते दिले नाही म्हणून मारेकर्यांने रागाच्या भरात हा खून केला ( Murder For Not Renting House In Dhule) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मारेकर्याने सायंकाळी 6.30 ते 7 च्या सुमारास घरात घुसून रवींद्र पगारे याच्यावर पोटात धारदार शस्त्राने दोन वार केले. पगारे हा रक्ताच्या थारोळ्यात घरात जागीच मरण पावला.
पोलिसांनी फिरवली तपासाची सूत्रे
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांचे पथक तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता अवघ्या काही तासातच मारेकऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आले ( Dhule Police Cracked Murder Case ) आहे. आरोपीने खून का केला? याचा पुढील तपास पोलिस करत आहेत, अशी प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली.