गोपालगंज : बिहारच्या गोपालगंजमध्ये ( Acid attack in Gopalganj ) ५ किलो आंब्यावरून अॅसिड हल्ला ( Acid Attack on Brother for Mango ) झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जिल्ह्यातील बैकुंठपूर पोलीस स्टेशन हद्दीतील हमीदपूर गावातील आहे. जिथे काल रात्री आंब्यावरून झालेल्या भांडणानंतर द्विजेंद्र तिवारी (५५ वर्षे) यांच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला. ज्यात द्विजेंद्र तिवारी गंभीररीत्या भाजले. गंभीर अवस्थेत त्यांना गोपालगंज सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आंब्यासाठी भावावर अॅसिड हल्ला : घटनेच्या संदर्भात असे सांगितले जाते की, हमीदपूर गावातील रहिवासी असलेले पीडित द्विजेंद्र तिवारी आणि राजेश तिवारी हे दोघे भाऊ आहेत. दोघांमध्ये आधीपासून काही गोष्टींवरून वाद सुरू होता. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी आंबा बागेत आंबे तोडले जात होते. ज्या झाडावरून आंबे तोडण्यास मनाई होती, चुकून मजुरांनी त्याच झाडाचा 5 किलो आंबा तोडला. या घटनेनंतर राजेश तिवारी आणि द्विजेंद्र तिवारी यांच्यात वाद झाला. रात्री आंबे तोडण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. यादरम्यान द्विजेंद्र तिवारी यांच्यावर त्यांचा भाऊ आणि पुतण्याने अचानक हल्ला केला.
या प्रकरणाची पोलीसांकडून कसून चौकशी : पीडित द्विजेंद्र तिवारी यांना त्यांचा भाऊ राजेश तिवारी आणि पुतणे चंदन आणि हिमांशू यांनी जबरदस्तीने पकडले. त्यानंतर ज्वलनशील पदार्थाने चेहरा व केस जाळण्याचा प्रयत्न केला. असा आरोप पीडित द्विजेंद् तिवारी यांनी लावला आहे. द्विजेंद्र तिवारी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, आता पोलीस याचा तपास करीत आहेत.
पीडित द्विजेंद्र यांनी दिला पोलिसांना जबाब : द्विजेंद्र तिवारींनी पोलिसांना सांगितले की, माझा भाऊ हा माझा मत्सर करीत असे. माझ्या चेहऱ्याची आणि केसांची त्यांना अॅलर्जी होती. त्यामुळे आज केवळ 5 किलो आंब्यासाठी तिघांनी मिळून चपला मारून तोंडावर ज्वलनशील पदार्थ टाकला. त्यामुळे चेहरा भाजला. सध्या पीडित यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत.
आमच्याविषयी त्यांच्या मनात मत्सर होता : पीडित द्विजेंद्र तिवारी यांनी पोलिसांना सांगितले की, "ते सतत कोणत्याना कोणत्या कारणावरून बहाणा करून भांडायचे आणि बोलायचे. राजेश तिवारी हा आमचा मोठा भाऊ आहे. तो आमच्या मागे हात धुऊन लागला आहे. वाद इतका वाढेल, असे आम्हाला वाटले नव्हते. आज अचानक पाच किलो आंब्यावरून मारामारी झाली.
चेहऱ्यावर फेकले अॅसिड : मी डाॅक्टर असल्यामुळे त्यांना माझ्याविषयी अगोदरपासून मत्सर होताच. त्यात ते पुन्हा पुन्हा म्हणत असे की, मला तुमच्या केसांची आणि चेहऱ्याची अॅलर्जी आहे. आज आम्ही घरात जात असताना अचानक तिघांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि चेहऱ्यावर द्रव फेकले. आम्हालाही समजले नाही. दहा मिनिटांनंतर जेव्हा चेहऱ्याची आग होण्यास सुरुवात झाली तेव्हा कळले आणि ते म्हणत होते की, केस पुन्हा वाढू नये म्हणून केसांना लावा."
हेही वाचा : Kurla Building Collapse: कुर्ला इमारत दुर्घटना प्रकरण; घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल