ETV Bharat / city

तरुणाचे अनोख्या पद्धतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन - डॉ आंबेडकर जयंती बद्दल बातमी

तरुणाने अनोख्या पद्धतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. त्यांने डोक्यावरील केसात 'हॅपी डॉ. आंबेडकर जयंती' व 'जयभीम' अशी अक्षरे कोरली आहेत.

ठाणे
ठाणे
author img

By

Published : Apr 14, 2021, 5:36 PM IST

ठाणे - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबडेकरांची जयंती जगभरात मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत असते. मात्र, कोरोनाच्या विळख्यात अख्खे जगच सापडले आहे. याही वर्षी देशभरात करोनाचे संकट असल्यामुळे डॉ. आंबेडकर जयंती एकत्रितपणे साजरी करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी, एका अनुयायीने डोक्यावरील केसात 'हॅपी डॉ. आंबेडकर जयंती' व 'जयभीम' अशी अक्षर कोरून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. शंकरकुमार साहू असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील गया जिल्ह्याचा रहिवासी आहे. सध्या तो भिवंडीतील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे (सुपरवायझर)चे काम करून भिवंडीतील हनुमान नगर परिसरात गेली १० वर्षांपासून राहतो.

गेल्या 10 महिन्यात 10 वेळा डोक्यावरील केसात अक्षरे कोरून कोरोनाविषयी जनजागृती त्यांनी केली आहे. कोरोनाच्या काळात सुरुवातीला भिवंडीत प्रादुर्भाव वाढला होता. त्यावेळी त्यानेही लॉकडाऊन काळात डोक्यावरील केसात विविध प्रकारचे संदेश देणारे अक्षर कोरून तो राहत असलेल्या परिसरात कोरोना विषयी जनजागृती करत होता. त्याने गेल्या 10 महिन्यात 10 वेळा डोक्यावरील मागच्या भागातील केसात जनजागृतीसाठी अक्षरे कोरून त्यावेळी नागरिकांना कोरोनापासून बचाव कसा करावा असे संदेश देत होता. विशेष म्हणजे सर्वात आदी याची 'ई टीव्ही भारत'ने दखल घेऊन मे महिन्यात त्याच्या कोरोना विषयी सुरू असलेल्या जनजागृतीबाबत बातमी प्रसिद्ध केली होती.

मूळ गावातील जयंतीची आठवण -

मूळ गावी डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत असल्याचे शंकरकुमार याने सांगितले असून भिवंडीत वर्षभर काम करीत असताना मूळगावी डॉ. आंबेडकर जयंती साजरी करणासाठी मी दरवर्षी जात होतो. मात्र, जयंतीच्या वेळीच दुसऱ्यांदा कोरोनाच्या संकटामुळे जाता आले नाही. त्यामुळे डोक्यावरील केसात 'हॅपी आंबेडकर जयंती' आणि 'जयभीम' अक्षरे कोरली आणि त्याचे चित्रीकरण करून मूळ गाव असलेल्या बिहार तसेच मित्र व नातेवाईकांना फेसबुक व व्हाट्सअप ग्रुपवर पाठवून बाबासाहेबांना अभिवादन केल्याचे त्याने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.