ठाणे : रहादारीच्या रस्त्यालगत असलेल्या महावितरणच्या उघड्या रोहित्रच्या विजेचा जोरदार शॉक लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उल्हासनगरातील कॅम्प चार परिसरात एनसीटी शाळेनजीक रस्तालगत असलेल्या उघड्या रोहित्रच्या ठिकाणी घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला. विजय मुरलीधर बोदडे (वय २९) असे जागीच मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मृतक विजय हा उल्हासनगरातील कॅम्प चार परिसरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक १४ च्या परिसरात राहत होता. आज (सोमवारी ) सकाळच्या साडेनऊ वाजल्याच्या सुमारास विजय हा शाळेजवळच्या रस्त्यालगत असलेल्या उघड्या रोहित्रच्या ठिकाणी गेला. त्यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. या धक्क्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. काही वेळाने विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारा रिक्षा चालक दीपक नंदू शिरसाठ याला मृत विजय रोहित्रच्या ठिकाणी पडलेला दिसला. त्यानंतर रिक्षाचालकाने स्थानिक विठ्ठलवाडी पोलीस व विजयच्या कुटुंबाला माहिती दिली.
माहिती मिळताच विजयच्या कुटूंबियांनी आणि पोलिसांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला विजयचा मृतदेह उल्हासनगर मधील शासकीय मध्यवर्ती रूग्णालयात रवाना केला. यावेळी रोहित्रातील एक कळ काढण्यात आल्याचे निदर्शनास आल्याची माहिती महावितरणचे विभागीय अभियंता अशोक नरवडे यांनी दिली आहे. एक कळ काढण्यात आल्यानंतर दुसरी काढत असताना हा विजेचा धक्का या तरुणाला लागला असावा असा अंदाजही नरवडे यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी विद्युत निरिक्षकांना अहवाल देण्यात आला. त्यावर पुढील प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नरवडे यांनी दिली.
मृत विजयचे कुटुंब अंत्यत हलाखाच्या परिस्थिती मोलमजुरी करून उपजीविका चालवते. त्याच्या आईवडींलचे यापूर्वीच निधन झाले आहे. तो लहान भाऊ आणि बहिणीसोबत राहत होता. त्याच्या मृत्यूच्या बातमीमुळे तो राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारच्या सुमारास त्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी वर्गणी गोळा करून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र महावितरणाच्या अधिकाऱ्यांच्या मते या रोहित्राला संरक्षण लोखंडी जाळी होती. ती उघङून हा तरूण रोहित्राजवळ गेला असावा, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
महावितरणच्या उघड्या रोहित्राचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू - शॉक लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
महावितरणच्या उघड्या रोहित्रच्या विजेचा जोरदार शॉक लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उल्हासनगरातील कॅम्प चार परिसरात एनसीटी शाळेनजीक रस्तालगत असलेल्या उघड्या रोहित्रच्या ठिकाणी घडली आहे. विजय मुरलीधर बोदडे असे जागीच मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.