ठाणे - सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. पतीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याने पत्नीने विष पिऊन जीवन संपविल्याचे बोलले जात आहे. शहरातील कॅम्प नं. 4 येथील आशाळेपाडा परिसरात संबंधित प्रकार समोर आला आहे. माधुरी शर्मा (वय-24), असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात पतीसह प्रेयसी व अन्य सात जणांविरोद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
माधुरीचा अजयकुमार शर्मासोबत सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. वारंवार माहेरून पैसे आणण्यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे. याचसोबत अजयकुमारचे तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधी माधुरीच्या वडिलांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रर दाखल केली आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी माधुरीचा पती अजयकुमार, दोन दीर, दोन जाऊ व सासूसह प्रेयसीवर गुन्हा दाखल केला आहे. यासंबधी अधिक तपास महिला पोलीस अधिकारी पाटील करत आहेत.