ठाणे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवर अपमानास्पद टिप्पणी woman arrested for making insulting posts about Amrita Fadnavis केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने ठाण्यातील एका महिलेला अटक केली. आयपीसी आणि आयटी कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या महिलेने आपली ओळख लपवण्यासाठी बनावट प्रोफाइलचा वापर केला होता. तिला 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फेसबुकवर शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने एका महिलेला अटक केली आहे. स्मृती पांचाळ असं महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी महिलेचा मोबाईल जप्त केला आहे. या महिलेला ठाणे जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. अमृता फडणवीस यांनी ७ सप्टेंबरला फेसबुकला एक पोस्ट केली होती. त्या पोस्टवर एका युजरने आक्षेपार्ह शब्दात कमेंट करत शिवीगाळ केली होती. यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोस्ट डिलीट करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला होता.
-
Maharashtra Cyber arrested a woman from Thane for making derogatory remarks against Dy CM Devendra Fadnavis' wife Amruta Fadnavis on FB. FIR registered u/s of IPC & IT Act. The woman had used a fake profile to hide her identity. She has been sent to Police custody till 15th Sept.
— ANI (@ANI) September 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra Cyber arrested a woman from Thane for making derogatory remarks against Dy CM Devendra Fadnavis' wife Amruta Fadnavis on FB. FIR registered u/s of IPC & IT Act. The woman had used a fake profile to hide her identity. She has been sent to Police custody till 15th Sept.
— ANI (@ANI) September 13, 2022Maharashtra Cyber arrested a woman from Thane for making derogatory remarks against Dy CM Devendra Fadnavis' wife Amruta Fadnavis on FB. FIR registered u/s of IPC & IT Act. The woman had used a fake profile to hide her identity. She has been sent to Police custody till 15th Sept.
— ANI (@ANI) September 13, 2022
याआधीही अनेकदा अशा पोस्ट केल्याची माहिती- महिलेने आपली ओळख लपवण्यासाठी गणेश कपूर नावाने अकाऊंट तयार केलं होतं. पोलीस तपासात आयपी अॅड्रेस आणि मोबाईल एका महिलेच्या नावावर असल्याचं निष्पन्न झाले. ही महिला ठाण्यातील रहिवासी असल्याचं समजल्यानंतर रात्री तिला तेथून अटक कण्यात आली. महिलेने याआधीही अनेकदा अशा पोस्ट केल्याची माहिती मिळत आहे