ETV Bharat / city

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाण्यात शिवसेना टिकणार? काय आहे स्थिती, जाणून घ्या..

author img

By

Published : Jun 30, 2022, 8:33 AM IST

शिवसेनेत बंडाळी ( Eknath Shinde rebel ) झाल्याने आणि शिवसेनेची ( Shiv Sena in Thane news ) कमान सांभाळणारे एकनाथ शिंदे हे दिघे समर्थक असल्याने आता ठाण्यात शिवसेनेच्या ( Shiv Sena mla ) अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला आहे.

Shiv Sena survive in Thane
शिवसेना सत्ता ठाणे

ठाणे - तब्बल २५ वर्षे बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावावर सात्यत्याने ठाणे पालिका आणि ठाणे जिल्ह्यात शिवसेनेने २५ वर्षे सत्ता मिळवली. पण, आता शिवसेनेत बंडाळी ( Eknath Shinde rebel ) झाल्याने आणि शिवसेनेची ( Shiv Sena in Thane news ) कमान सांभाळणारे एकनाथ शिंदे हे दिघे समर्थक असल्याने आता ठाण्यात शिवसेनेच्या ( Shiv Sena mla ) अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला आहे.

माहिती देताना ज्येष्ठ पत्रकार

हेही वाचा - Eknath Shinde : एकनाथ शिंदेचं 'महाराष्ट्राचे बाहुबली'; ठाण्यात दक्षिण भारतीय विभागाची बॅनरबाजी

दि. आनंद दिघे यांच्यानंतर त्याच्या पाऊलावर पाऊल टाकून वाटचाल करीत एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात आपली पाळेमुळे रुजवली. त्यामुळे, शिंदे यांच्या बंडाळीने शिवसेनेला अवघ्या महाराष्ट्रात धक्का लागला. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आता बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेना राहिली काय? असा प्रश्न पडलेला आहे. अनेक नेते आणि शिवसैनिक हे 'वेट एन्ड वॉच' मध्ये आहेत. त्यामुळे, ठाण्यात शिवसेना नाही तर शिंदेसेना असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भलेही शिवसेनेकडे लोकांचा ओढा असला तरीही ठाण्यात मात्र एकच सेना शिंदे सेना असल्याचे चित्र आहे.

ठाण्यात बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक हे अजूनही बाहेर पडलेले नाहीत. शिंदे हे मजबूत होतात काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे, शिंदेसेना ठाण्यात रस्त्यात उतरलेली आहे. मात्र, शिवसेना अद्याप रस्त्यावर उतरलेली नाही हे एक विदारक सत्य आहे. ठाण्यात शिवसेना ही पदाधिकारी यांच्या शोधात आहे. त्यामुळे, उंबरठ्यावर आलेल्या पालिका निवडणुकात ठाणे पालिका असो किंवा अन्य पालिका यावर शिवसेनेचा भगवा फडकणार नसल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान सरकारचा निकाल आणि सत्तांतर याचा निकाल लागल्यानंतर मात्र ठाण्यात शिवसेना सरस की शिंदे सेना, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे गटातील आमदाराला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.