ठाणे नवऱ्याने बायकोला मोबाईल हाताळण्यास दिला नसल्याच्या वादातून Husband wife dispute over mobile phone बायकोने बळजबरीने नवऱ्याच्या हातातून मोबाईल खेचून जमिनीवर आपटून फोडला mobile pulled from husband and broken. त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊन बायकोने रागाच्या भरात लाकडी पाट उचलून नवऱ्याच्या डोक्यात मारत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील शहाड wife beaten husband Shahad Thane गावात घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात khadakpada Police Station बायको विरुद्ध नवऱ्याने विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. जयेंद्र दिनकर पाटील वय ३६, राहणार शहाड, कल्याण पश्चिम असे गंभीर जखमी झालेल्या नवऱ्याचे नाव आहे. तर शमिका जयेंद्र पाटील वय २७ वर्षे असे गुन्हा दाखल झालेल्या बायकोचे नाव आहे. wife broke husband head mobile dispute Thane
मोबाइलच्या वादातून नवऱ्याशी भिडली तक्रारदार नवरा जयेंद्र हा बायकोसोबत कल्याण पश्चिम भागात असलेल्या शहाड गावात राहतो. विशेष म्हणजे जयेंद्र हा गावचा पोलीस पाटील आहे. त्यातच रविवारी रात्री साडे दहा वाजता जेवण आटपून नवरा बेडरूममध्ये मोबाईल हातात घेऊन त्या मधील बातम्या बघत होचा. त्याने बराच वेळ झाला तरी मोबाईल बायकोला दिला नाही. म्हणून बायकोने नवऱ्याला मोबाईल देण्याची मागणी करू लागली. मात्र बातम्या बघतोय थोड थांब, असे नवरा बोलत असतानाच बायको शमिकाने नवऱ्याच्या हातामधील मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटल्याने मोबाईल तुटला.
देवपूजेचा पाट नवऱ्याच्या डोक्याची लावली वाट त्यानंतर तुझ्यामुळे माझे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. तु आमच्यामध्ये येतोस. तुला मी व राहुल भंडारी बघून घेऊ, असे बोलत पूजेसाठी लागणारा लाकडी पाट उचलून बायकोने नवऱ्याच्या डोक्यात जोरात मारला. यामुळे नवऱ्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. बायको एवढ्यावरच थांबली नाही. तर तिने राहुल भंडारीला बोलावून तुझे काम आता तमाम करुन टाकते, अशी धमकीही नवऱ्याला दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एम. जाधव करीत आहे.