ETV Bharat / city

Dahi Handi का भारी आहे वर्ल्ड रेकॉर्ड वाली 21 लाखांची दहीहंडी

देशातल्या प्रमुख दहीहंडी मध्ये संस्कृती प्रतिष्ठानाची Sanskruti Pratishan प्रो गोविंदा ही दहीहंडी Dahi Handi गणली जाते. माजिवडा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सन १९९९ पासून दहीहंडी आयोजित करण्यास सुरूवात केली. तर यंदा प्रो गोविंदा २०२२ ही एकच तत्व हिंदुत्व या विचारधारेवर धुमधडाक्यात आयोजित करण्यात आली आहे. या दहीहंडीत जय जवान मंडळाचा २०१२ सालचा विक्रम मोडणाऱ्या मंडळाला २१ लाखाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

World Record Dahi Handi Of Sanskriti Pratishthan
दहीहंडी
author img

By

Published : Aug 12, 2022, 3:50 PM IST

ठाणे - ठाणे हे तलावाशिवाय दहीहंडी Dahi Handi उत्सव प्रेमींचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला टेंभी नाका दहीहंडीचा इतिहास ( History of Dahi Handi ) लाभला आहे. या साऱ्यापासून प्रेरणा घेत १४५ ओवळा माजिवडा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सन १९९९ पासून दहीहंडी आयोजित करण्यास सुरवात केली. या दहीहंडीचे रूपांतर पुढे ‘प्रो गोविंदा दहीहंडी’ मध्ये झाले. सन २०१२ साली जोगेश्वरीच्या जय जवान मंडळाने प्रो गोविंदा दहीहंडीत ९ थर रचत विश्वविक्रम देखील घडवला. देशातल्या प्रमुख दहीहंडी मध्ये संस्कृती प्रतिष्ठानाची Sanskruti Pratishanप्रो गोविंदा ही दहीहंडी गणली जाते. प्रो गोविंदा २०२२ ही एकच तत्व हिंदुत्व या विचारधारेवर धुमधडाक्यात आयोजित करण्यात आले आहे. या दहीहंडीत जय जवान मंडळाचा २०१२ सालचा विक्रम मोडणाऱ्या मंडळाला २१ लाखाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय इतर मंडळांना ११ लाख, ५ लाख, ३ लाख अशी बक्षिसे सुद्धा देण्यात येणार आहे.

का भारी आहे वर्ल्ड रेकॉर्ड वाली 21 लाखांची दहीहंडी

दहीहंडीचा खेळामध्ये समावेश प्रताप सरनाईक यांच्या मागणीमुळे काही दिवसांपूर्वी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेनी घेतला. दहीहंडीला जागतिक पाळतीवर नेण्यासाठी दहीहंडीचा समावेश क्रीडाप्रकारात करण्यात यावा अशीही मागणी त्यांच्याद्वारे करण्यात आली होती. यामुळे गोविंदांना क्रीडापटू म्हणून मान्यता मिळून शासकीय लाभ घेता येतील. प्रत्येक गोविंदाला १० लाखांचा विमा कवच देण्याचा निर्णय देखील सरकारने नुकताच घेतला आहे. गोविंदाच्या मागे शिवसेना भाजप सरकार ठामपणे उभे आहे.

दरवर्षी शेकडो मंडळ लावतात हजेरी या संस्कृतीच्या दहीहंडीसाठी दरवर्षी शेकडो मंडळ हजेरी लावतात आणि मानवंदना देऊन इतरहंडांकडे वळतात दरवर्षी हजेरी लावणाऱ्या मंडळांमधली मुंबईतील सर्वच नामांकित मंडळ आहेत. त्या सोबत ठाणे मुंबई पुणे पालघर परिसरातील अनेक मंडळात संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये मानवंदना देतात, तर रचणाऱ्या प्रत्येक मंडळाला मानधन दिले जाते. यावरच ही मंडळ वर्षभर सामाजिक उपक्रम देखील घेत असतात.

हेही वाचा : National Youth Day 2022 राष्ट्रीय युवा दिवसाचे काय आहे महत्त्व जाणून घ्या इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.