ETV Bharat / city

शाहरूख खानचा मुलगा असेल किंवा कोणीही, कठोर कारवाई झाली पाहिजे - रामदास आठवले

एका क्रुझ शिपवर काल रात्रीच्या सुमारास एनसीबीने छापा टाकला. त्यामध्ये अभिनेता शाहरूख खान याच्या मुलाचा समावेश असल्याचे समोर येताच सिने जगतात एकच खळबळ उडाली. यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. अमली पदार्थाच्या या गंभीर प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा असेल किंवा कोणीही त्यास कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

शाहरूख खान मुलगा कारवाई रामदास आठवले
Athawale on action on Shah Rukh son
author img

By

Published : Oct 3, 2021, 4:17 PM IST

Updated : Oct 3, 2021, 5:04 PM IST

ठाणे - एका क्रुझ शिपवर काल रात्रीच्या सुमारास एनसीबीने छापा टाकला. त्यामध्ये अभिनेता शाहरूख खान याच्या मुलाचा समावेश असल्याचे समोर येताच सिने जगतात एकच खळबळ उडाली. यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. अमली पदार्थाच्या या गंभीर प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा असेल किंवा कोणीही त्यास कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री आठवले

हेही वाचा - विद्यार्थ्यांनो लागा तयारीला, उद्यापासून शाळांची घंटा वाजणार; सर्वत्र स्वच्छतेची लगबग

अमली पदार्थाच्या विळख्यात सिनेसुष्टी अडकली

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर एनसीबीने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत अटक केलेल्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलाचाही समावेश असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, सुशांतच्या मृत्यूनंतर सिनेजगतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन करणारे नटी आणि नट आढळून आले. त्यामुळे, अमलीपदार्थाच्या विळख्यात सिनेसुष्टी अडकली आहे. रात्री एका शिपमध्ये ड्रग्स पार्टी सुरू असताना, त्यामध्ये शाहरूख खानचा मुलगा असेल किंवा कुणीही असेल त्यास पकडण्यात आले आहे, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आपली मागणी असल्याचे आठवले म्हणाले. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अमलीपदार्थ मुक्त मुंबईची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डोंबिवली अत्याचार प्रकणारातील ३३ आरोपींना फाशी द्या

डोंबिवलीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. तब्बल ३३ आरोपींनी पीडितेवर वारंवार सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज डोंबिवलीत आले होते. त्यांनी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली, तसेच मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सामूहिक बलात्कारच्या घटनेचा निषेध व्यक्त करीत या गुन्ह्यातील ३३ आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी अठवले यांनी केली असून यासाठी आपण लढा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पीडितेच्या कुटुंबाला २० लाख सरकारी मदत देण्याची मागणी

मानपाडा पोलिसांनी सर्वच आरोपींना तत्काळ कारवाई करत अटक केली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन कसे करता येईल, याबाबत जिल्हा अधिकारी यांच्याशी बोलून पीडित कुटुंबाला घर व सरकारी मदत कशी लवकर मिळाले, यावर तातडीने निर्णय घेण्याचे संकेत आठवले यांनी दिले. तसेच, पीडित मुलीच्या कुटुंबाला रिपाई आठवले गटाकडून १ लाखांची तातडीने मदत देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय सरकारच्या मनोधैर्य योजनेतून पीडित कुटुंबाला मिळणारी १० लाखांच्या आर्थिक मदती ऐवजी २० लाख देण्याची मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.

..तर राज्य सरकार खड्ड्यात जाणार

जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणच्या शहरात दोन वर्षांत खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मात्र, राज्य सरकार केवळ सत्ता टिकविण्यासाठी एकमेकांवर आरोपप्रत्योरोप करीत असल्याने खड्डे बुजविण्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे, जर सरकारने खड्डे बुजविले नाही तर, हे राज्य सरकार खड्ड्यात जाणार असल्याची खोचक टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर केली. रामदास आठवले हे डोंबिवलीत त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमांना आले होते. त्यावेळी येताना त्यांनाही खड्ड्यांचा सामना करीत डोंबिवली गाठावी लागली.

आगामी सर्व महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती

रामदास आठवले यांनी कल्याण - डोंबिवली महापालिका निवडणुकीसह राज्यातील इतरही महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीचे संकेत दिले आहे. यासाठी त्यांनी भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांशी युतीबाबत बोलणे झाले असल्याचे सांगून कल्याण - डोंबिवली महापालिकेची निवडणूक मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी होणार आहे. कल्याण - डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपचा महापौर आणि रिपाई आठवले गटाचा उपमहापौर झाला पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न असणार असल्याचे रामदास आठवले यांनी पत्रकरांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा - घरफोडीच्या गुन्ह्यातील 8 सराईत चोरटे जेरबंद; 63 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Last Updated : Oct 3, 2021, 5:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.