ETV Bharat / city

शुक्रवारी शहरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद - ठाणे पाणीपुरवठा खंडित

पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी शटडाऊन घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

hane city Water supply
शुक्रवारी शहरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद
author img

By

Published : May 28, 2020, 4:48 PM IST

ठाणे - महानगरपालिकेच्या पिसे उदंचन केंद्र व टेमघर जलशुध्दीकरण केंद्र येथील सबस्टेशनमधील पावसाळ्यापूर्वी कामे करण्याकरिता शुक्रवारी (दि. 29) सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यत 12 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.

परिणामी घोडबंदर रस्ता, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, जॉन्सन, इटरनिटी, समतानगर ऋतुपार्क, सिध्देश्वर जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजय नगर, कळव्याचा काही भाग इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन उपनगर अभियंता पाणी पुरवठा विभाग यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.