ETV Bharat / city

कल्याणमध्ये गणेश विसर्जनादरम्यान कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू - Volunteer has died due to electric shock

कल्याण पश्चिमेकडील बेतूरकर पाडा परिसरात गणेश विसर्जनासाठी गणेश मूर्ती विसर्जनासाठी लाईट तपासण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू झाला. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

kalyan
kalyan
author img

By

Published : Sep 20, 2021, 10:33 PM IST

ठाणे - गणेश विसर्जनासाठी गणेश मूर्ती मंडपाबाहेर काढताना विजेचा जोरदार झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कल्याण पश्चिमेकडील एव्हरेस्ट नगर परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. प्रशांत चव्हाण ( वय 28) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू
पावसामुळे झाला आघात कल्याण पश्चिमेकडील बेतूरकर पाडा परिसरात एव्हरेस्ट नगर मित्र मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही मंडळाकडून गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. रविवारी विसर्जनासाठी मंडळाचे कार्यकर्ते गणेश मूर्ती बाहेर काढत होते. तेव्हा जोरदार पाऊस असल्याने मंडपातील लाईट बंद चालू होत होती. म्हणून मंडळाचा कार्यकर्ता प्रशांत चव्हाण लाईट तपासण्यासाठी पुन्हा मंडपात गेला. मात्र तपासणी करताना त्याला विजेचा जोरदार शॉक लागला. त्याचा आवाज ऐकून मंडळातील इतर कार्यकर्त्यांनीही त्या ठिकाणी धाव घेतली. प्रशांतला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आणि प्रशांतचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात एकच शोककळा पसरली आहे. हेही वाचा - बाप्पाला निरोप दिल्यानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर शाहरुख खान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.