ETV Bharat / city

मनसुख यांच्या हत्येसाठी सचिन वाझेंना सुरक्षा देणारे ते दोन पोलीस अधिकारी कोण ? - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण न्यूज

तपासात समोर आल्याप्रमाणे मनसुख यांना बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर ठाण्यातील गायमुख चौपाटी येथे एका गाडीत टाकून मनसुख यांना गायमुख चौपाटी ते मुंब्रा रेतीबंदरपर्यंत एका गाडीत नेण्यात आले. तर ही गाडी सचिन वाझेची होती. आश्चर्य म्हणजे दोन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या सचिन वाझेच्या गाडीला संरक्षण दिल्याचे समोर आले.

Two police officers given protection to Sachin Wazes vehicle
सचिन वाझेंना सुरक्षा देणारे पोलीस अधिकारी
author img

By

Published : Apr 1, 2021, 7:48 PM IST

ठाणे - ठाण्यात मनसुख हिरेन प्रकरणात तपास यंत्रणांना मनसुख यांना बेशुद्ध करून त्यांची हत्या करण्यासाठी जाताना दोन पोलीस सुरक्षा देताना आढळले आहेत. आता हे संरक्षण देणारे ते दोन पोलीस निरीक्षक कोण? असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर अप्रत्यक्षरित्या हत्येचा कटात त्यांचा सहभाग कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आदेश दिले होते का? याचादेखील शोध घेतला जात आहे.

मनसुख हे 4 मार्च रात्री ठाण्यातून क्लासिक डेकॉर या दुकानातून घरी निघाले. यावेळेस त्यांच्या मुलाने विचारले, इतक्या लवकर कुठे निघालात. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, मला एक अर्जंट काम असल्याने जावे लागेल. स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या गाडी संदर्भात चौकशी संदर्भात मला जावे लागणार आहेय तिथून मनसुख त्याच्या नौपाडा येथील विकास पाम या सोसायटीत गेला. लगबगीने जेवून मनसुख साडेआठच्या सुमारास घरातून निघाले. यावेळेस घरच्यांना विचारले असता कांदिवली क्राइमब्रांचमधील ए. तावडे नावाचे अधिकारी यांनी मला तपासा करताा बोलाविल्याचे त्यांनी सांगितले. मनसुख गेल्यानंतर रात्री साडेदहा त्यांचा फोन बंद झाला. त्यामुळे घरच्यांची चिंता वाढू लागली होती.

सचिन वाझेंना सुरक्षा देणारे ते दोन पोलीस अधिकारी कोण

हेही वाचा-INTERVIEW : सचिन वाझे, विनायक शिंदे प्रकरणी माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी धनराज वंजारींसोबत बातचीत

पाच मार्चच्या सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख यांचा मृतदेह सापडला. 4 मार्चच्या रात्री दहा वाजल्यापासून ते पाच मार्चच्या सकाळी साडे दहा वाजेपर्यंत मनसुख यांच्यासोबत नेमके काय घडले, याबाबत तपास केला त्यात धक्कादायक माहिती समोर आली होती. मात्र एनआयएने केलेल्या चौकशीत आणि तपासात 4 मार्चला मनसुख हे व्हाट्सअप कॉल वरून कोणाच्या तरी सतत संपर्कात होते.

दोन पोलीस निरीक्षकांनी सचिन वाझेच्या गाडीला दिले संरक्षण

तपासात समोर आल्याप्रमाणे मनसुख यांना बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर ठाण्यातील गायमुख चौपाटी येथे एका गाडीत टाकून मनसुख यांना गायमुख चौपाटी ते मुंब्रा रेतीबंदरपर्यंत एका गाडीत नेण्यात आले. तर ही गाडी सचिन वाझेची होती. आश्चर्य म्हणजे दोन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या सचिन वाझेच्या गाडीला संरक्षण दिल्याचे समोर आले. या दोन पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या संरक्षणात बेशुद्धावस्थेत असलेल्या मनसूख यांना मुंब्रा रेतीबंदर खाडीपर्यंत पोहोचवले. या दोन पोलीस निरीक्षकांनी सचिन वाझेच्या गाडीला संरक्षण दिले. कारण जर गायमुख चौपाटी ते मुंब्रा रेतीबंदर यादरम्यान जर पोलीस बंदोबस्त अथवा नाकाबंदी दरम्यान बेशुद्धावस्थेतील मनसुख त्या गाडीत असल्याचे समोर आले असते. ती गाडी चेक न होता पुढे सोडली जावी, याकरता या दोन पोलीस निरीक्षकांनी सचिन वाझेच्या गाडीला संरक्षण दिले होते, अशी सूत्राने माहिती दिली.

हेही वाचा-बार, क्लबच्या आकाराप्रमाणे केली जायची हप्ता वसुली; विनायक शिंदेच्या डायरीतून माहिती आली समोर

ठिकाणाची दिशाभूल करण्यासाठी वाझेंनी मोबाईल ठेवला पोलीस आयुक्त कार्यालयात

सुत्राच्या माहितीनुसार दुसरीकडे याचदरम्यान सचिन वाझे यांनी त्यांचा मोबाईल मुंबई पोलीस आयुक्तालयातील सीआययु या मुंबई क्राईम ब्रँच कार्यालयात ठेवला होता. कारण मनसुखचा मृत्यू केव्हा झाला व मनसुख सोबत जे काही घडले त्यावेळेस आपण तिथे नव्हतो हे दाखवण्याकरता त्यांनी तसे केले. तिथे पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्याला त्या मोबाईलची देखरेख करण्यास ठेवण्यात आले होते. जर कोणाचा फोन आला तर सचिन वाझे व्यस्त असल्याचे सांगायचे, असे पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला सांगण्यात आलं होते. तपासात ते सर्व समोर आल्यानंतर एनआयएने सचिन वाझे यांचा चार मार्च आणि पाच मार्च या दोन दिवसांचा सीडी आर म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड काढला. या 4 मार्च रात्री आणि 5 मार्च दरम्यान सचिन वाझे याला एकही फोन आला नाही. केवळ कंपन्यांचे जाहिरातीचे आठ मेसेज आले होते. याचा अर्थ मनसुख यांची हत्या करता सचिन वाझे आणि टीमने लोकेशन डिफरन्ससी या प्रकारचा खेळ खेळला होता. पण लोकेशन व्यतिरिक्त तपास यंत्रणांकडे सचिन वाझे याच्या विरोधात इतके भक्कम पुरावे असल्याचे एनआयएच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा-मिठी नदीत सापडलेला डीव्हीआर सचिन वाझेच्या सोसायटीचा, अनेक गूढ उलगडणार

मनसुख यांनी नोंदविला खोटा जवाब ?

सुत्राच्या माहितीनुसार वाहन चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर मनसुख हिरेन यांचा जवाब नोंदविला गेला आहे. त्या जवाबात आणि स्फोटकाची स्कॉर्पिओ मिळाल्यानंतर मनसुख यांनी खरी माहिती लपवली आहे, असा संशयदेखील तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे हा जवाब भीतीपोटी व माहिती लपवण्यासाठी दिला होता का, असा प्रश्न उभा राहत आहे. सीआरपीसी कलमानुसार खोटी माहिती देणे अथवा सत्य माहिती लपवणे हादेखील एक गुन्हा आहे. अशा वेळी आता तपास यंत्रणा पुढे काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.