ETV Bharat / city

भिवंडीत काविळच्या आजाराने आदिवासी युवतीचा मृत्यू

author img

By

Published : Sep 12, 2019, 11:46 AM IST

कावीळच्या आजाराने एका 20 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना सामोर आली आहे. आरोग्य विभागाकडून आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नसल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

मृत कविता सातवी

ठाणे - भिवंडी तालुक्यातील जुनांदूर्खी (सातवीपाडा) येथील २० वर्षीय आदिवासी युवतीचा काविळच्या आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कविता रघुनाथ सातवी (रा. जुनांदूर्खी ) असे मृत युवतीचे नाव आहे. या आदिवासी युवतीच्या मृत्यूने भिवंडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

हेही वाचा - बदलापुरात सेनेतच राडा : सेनेच्याच नगरसेवकांनी फोडले शिवसेना नगरसेवक वडनेरेंचे कार्यालय

मृतक कविता ही मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे बायपास येथील गोदामात नोकरी करत होती. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे. गेल्या पाच दिवसांपासून तिला उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे उपचारासाठी प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तात्काळ मुंबईच्या जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

सद्या पावसाळ्याचे दिवस आहे. भिवंडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. शिवाय आदिवासी पाड्यांवर असलेल्या पाणवठ्यांचे शुद्धीकरण केले जात नाही. त्यामुळे नागरिकांना मृत्यूला कवटाळावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्या प्रमिला प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Intro:Body: कावीळच्या आजाराने आदिवासी युवतीचा मृत्यू
ठाणे : भिवंडी तालुक्यातील जुनांदूर्खी ( सातवीपाडा ) येथील २० वर्षीय आदिवासी युवतीचा कावीळच्या आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कविता रघुनाथ सातवी (रा. जुनांदूर्खी ) असे कावीळच्या आजाराने मृत झालेल्या युवतीचे नांव आहे. या आदिवासी युवतीच्या मृत्यूने भिवंडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा समोर आला आहे.
मृतक कविता हि मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे बायपास येथील गोदामात नोकरी करून आपल्या कुटूंबाला हातभार लावत होती. गेल्या पाच दिवसांपासून तिला उलट्या होऊ लागल्याने उपचारासाठी प्रथम तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तात्काळ मुंबईच्या जेजे रुग्णालयात हलवण्यात येऊन उपचार सुरु करण्यात आले होते.मात्र काल रात्री उपचार सुरु असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सद्या पावसाळ्याचे दिवस असतानाही भिवंडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या जात नाहीत. आदिवासी पाड्यांवर असलेल्या पाणवठ्यांचे शुद्धीकरण केले जात नाही. त्यामुळे नागरिकांना मृत्यूला कवटाळावे लागत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्या प्रमिला प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.