ठाणे - सुरुवातीच्या काळातील चुल आणि मुलं याच सीमेत न राहता अनेक महिला उच्च शिक्षण घेऊन चांगल्या हुद्द्यावर नोकरीला जाऊ लागल्या आहेत. ( The story of Amrit Mahotsav ) तर, ज्या महिलांना शिक्षण घेता आले नाही त्या स्वतःचा व्यवसाय करुन किंवा मिळेल ते काम करुन आपल्या संसाराचा गाडा पुढे नेत आपल्या पायावर खंबीरपणे उभ्या राहत आहेत. अशीच काहीशी कहाणी आहे ठाण्यातील पहिल्या महिला रिक्षा चालक अनामिका भालेराव यांची-
अनामिका या ठाण्यातील पहिल्यांदा महिला रिक्षा चालक - अनामिका भालेराव यांनी 2012 साली रिक्षाच स्टेरिंग हातात घेत ठाण्यातील रस्त्यांवर रिक्षा चालवायला सुरुवात केली. अनामिका यांचे पती अविनाश भालेराव हे देखील रिक्षा चालकच, घरची परिस्थिती हालाकीची त्यात मुला मुलींचं शिक्षण त्यामुळे पती अविनाश यांनी कमवून आणलेले पैसे हे अपुरे पडत होते. त्यामुळे अविनाश यांना संसार चालवण्यासाठी हातभार लावावा या भावनेने अनामिका यांनी पती अविनाश यांना रिक्षा चालवण्याची ईच्छा व्यक्त केली. सुवातीला परिवारातील लोकांनी याबाबत कुणकुण सुरु केली. मात्र, पती अविनाश ने अनामिका यांना साथ देत रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण सुरु केले आणि त्यामुळेच अनामिका या ठाण्यातील पहिल्यांदा महिला रिक्षा चालक बनल्या.
महिला प्रवाशांना सुरक्षितता देण्यासाठी या व्यवसायात - अनामिका रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करण्यापलीकडे अन्य कोणतेही व्यवसाय किंवा दुसरा कोणताही नोकरीं धंदा करु शकल्या असत्या पण जर एका महिला रिक्षा चालकाच्या रिक्षात एखादी महिला बसली कि ती स्वतःला अधिक सुरक्षित समजते या भावनेने अनामिका यांनी रिक्षा चालवण्याचा विचार मनात आणला असल्याची भावना अनामिका व्यक्त करतात. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत त्यामुळे आम्हाला जस स्वातंत्र्य मिळालं तस ईतर महिलांना देखील त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करुन देण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी आणि इतरांनी पाठबळ देण गरजेचं असल्याच देखील अनामिका भालेराव सांगतात.
हेही वाचा - न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात स्वातंत्र्याची ७५ वर्षा निमित्त विविध कार्यक्रम