ETV Bharat / city

लॉकडाऊनला कंटाळून घरातून गेलेला तरुण पोलिसांमुळे सुखरूप स्वगृही

ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट भागात राहणारा 17 वर्षीय सिद्धार्थ खरबे हा युवक बुधवारी भल्या पहाटे सायकल सवारीसाठी घरातून निघाला. मात्र, सकाळचे 10 वाजले तरी घरी न परतल्याने पालक चिंताग्रस्त झाले. नेहमी सायंकाळी सायकलींगसाठी जाणारा सिद्धार्थ आज सकाळीच घरातून गेला होता.

The youth tired of the lockdown  left the house  is return back to home thane
लॉकडाऊनला कंटाळून घरातुन गेलेला युवक पोलिसांमुळे सुखरूप स्वगृही
author img

By

Published : Aug 27, 2020, 12:13 PM IST

ठाणे - लॉकडाऊनला कंटाळून घरातून निघून गेलेल्या 17 वर्षीय युवकाला ठाणे पोलिसांनी सुखरूप स्वगृही पोहोचवले. त्यामुळे ठाणे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलिसांना शाब्बासकी देतानाच, पालकांनाही आपल्या पाल्यांवर अभ्यासाचे अथवा अवास्तव अपेक्षांचे ओझे न लादता मुलांना स्वच्छंदीपणे राहू द्या, असे आवाहन केले आहे.

लॉकडाऊनला कंटाळून घरातून गेलेला युवक पोलिसांमुळे सुखरूप स्वगृही

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनला आबालवृद्धांसह विद्यार्थीही कंटाळले आहेत. शाळा-कॉलेज बंद असल्याने मुक्तपणे हिंडण्याफिरण्यावर बंधने आली असून खेळ, जीम बंद असल्याने कसरतीलाही खीळ बसली आहे. त्यामुळे ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट भागात राहणारा 17 वर्षीय सिद्धार्थ खरबे हा युवक बुधवारी भल्या पहाटे सायकल सवारीसाठी घरातून निघाला. मात्र, सकाळचे 10 वाजले तरी घरी न परतल्याने पालक चिंताग्रस्त झाले. नेहमी सायंकाळी सायकलींगसाठी जाणारा सिद्धार्थ आज सकाळीच घरातून गेला होता. मोबाईलवरही संपर्क होईना. त्यानंतर त्याच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठले. अखेरचे लोकेशन भांडुप दाखवल्यानंतर सिद्धर्थला शोधण्यासाठी ठाणे पोलिसांनी मुंबईकडे कूच केली.

तक्रारीची दखल घेत पोलीस आयुक्त फणसळकर यांनी सुत्रे हलवली. कासासवडवली पोलीस, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेच्या पथकाने सर्व अपघात स्थळे तसेच, रुग्णालयांमध्ये चौकशी केली असता, युवकाच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची खात्री पटली. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे मोबाईल लोकेशन हेरले असता मुंबईतील कुलाबा येथे असल्याचे कळले. त्यानुसार कुलाबा पोलिसांशी संपर्क साधून तेथून त्या युवकाला ताब्यात घेऊन सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. ठाण्यातून पूर्वद्रुतगती मार्गाने मजल दरमजल करीत भांडुप, पवई असा मुंबईत प्रवास करीत कुलाबा भागात पोहोचल्याची कबुली युवकाने दिली.

गेली 5 महिने लॉकडाऊनमुळे मनःस्ताप झाला असल्याचे सिद्धार्थने सांगितले. आपण केलेल्या कृत्याचे त्याला वाईट वाटले. दरम्यान, भविष्यात माझ्याकडून अशी चूक होणार नसल्याची ग्वाही सिद्धार्थने ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच पालकांना दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.