ETV Bharat / city

Vegetable Seller Beats Woman In BhiWandi City : घरात घुसून गर्भवतीस बेदम मारहाण, महिलेचा झाला गर्भपात - Onion potato seller beats woman

एका कांदे बटाटा विक्रेत्याने पूर्व वैमनस्यातून २२ वर्षीय गर्भवती महिलेस शिवीगाळ करत घरात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. (Vegetable Seller Beats Woman In BhiWandi City) दरम्यान, या घटनेत अनैसर्गिकपणे गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना भिवंडी शहरातील कामतघर परिसरात घडली आहे.

author img

By

Published : Jan 6, 2022, 9:51 AM IST

ठाणे - एका कांदे बटाटा विक्रेत्याने पूर्व वैमनस्यातून २२ वर्षीय गर्भवती महिलेस शिवीगाळ करत घरात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेत अनैसर्गिकपणे गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Beats Woman In Bhiwandi City) हि घटना भिवंडी शहरातील कामतघर परिसरात घडली आहे. (Vegetable Seller Beats Woman) याप्रकरणी मारहाण करणाऱ्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजित उर्फ लल्ला वर्मा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी कांदे बटाटा विक्रेत्याचे नाव आहे.

या भांडणाची पीडित महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती

या घटनेचे अधिक वृत्त असे की, आरोपी सुजित आणि पीडित फिर्यादीचे पती अमर चौधरी यांच्यात १० ऑक्टोबर २०२१ रोजी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाची पीडित महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून २ जानेवारी रोजी दुपारी साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास पीडितेचा पती घरात नसताना आरोपी सुजित बळजबरीने घरात घुसून गरोदर पीडितेला अश्लील शिवीगाळ व धमकी देवून लाकडी दांडक्याने तिच्या हातावर, कमरेवर, पायावर तसेच पोटावर जोरात लाकडी दांडका टोचल्याने पीडितेचा ८ आठवड्यांच्या गर्भाचा रक्तस्त्राव होऊन अनैसर्गिकपणे गर्भपात झाला आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आरोपी सुजितवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - Sindhutai Sapkal : अनाथांच्या दु:खांवर फुंकर घालणारी माय हरपली, ईटीव्ही भारतकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.