ETV Bharat / city

अभ्यासाचा तगादा लावला म्हणून अल्पवयीन मुलीने केला आईचा खून - mumbai murder news

आपली मुलगी डॉक्टर व्हावी अशी या दांपत्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी मुलीला मे महिन्यात नीटचा क्लास लावला होता. मुलीने नीटची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करावी म्हणून मुलीची आई शिल्पा ही सतत मुलीवर अभ्यासासाठी दबाव आणीत होती. त्यामुळे सतत दोघींमध्ये भांडण होत होती.

आईचा मुलीने केला खून
आईचा मुलीने केला खून
author img

By

Published : Aug 10, 2021, 12:49 PM IST

Updated : Aug 10, 2021, 3:12 PM IST

नवी मुंबई - सतत अभ्यास कर म्हणून तगादा लावणाऱ्या आईला स्वत:च्या पोटच्या मुलीनेच कराटेच्या कापडी पट्ट्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. आईचा खून केल्यानंतर मुलीने आईच्या आत्महत्येचा केल्याचा बनाव देखील केला होता. मात्र, तपासाअंती 15 वर्षाच्या मुलीनेच आईला मारून टाकल्याचे समोर आले आहे.

अभ्यासाचा तगादा लावला म्हणून अल्पवयीन मुलीने केला आईचा खून
  • डॉक्टर होण्यासाठी आईवडीलांचा दबाव

ऐरोलीमधील सेक्टर 7 येथील राकेश सोसायटीत शिल्पा जाधव (40) व संतोष जाधव (44) हे दांपत्य राहत होते. त्यांना 15 वर्षाची मुलगी व 6 वर्षांचा मुलगा आहे. आपली मुलगी डॉक्टर व्हावी अशी या दांपत्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी मुलीला मे महिन्यात नीटचा क्लास लावला होता. मुलीने नीटची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करावी म्हणून मुलीची आई शिल्पा ही सतत मुलीवर अभ्यासासाठी दबाव आणीत होती. त्यामुळे सतत दोघींमध्ये भांडणही होत होती.

  • पोलिसांनी मायलेकींमध्ये केला होता समझोता

आपल्या मुलीने सतत अभ्यासात व्यस्त राहावे म्हणून आईवडील मुलीवर दबाव टाकत होते. त्यातच 27 जुलैला मुलीने मोबाईल घेतल्याने वडील संतोष हे तिला ओरडले होते. त्यामुळे ती रागावून जवळच राहणारे मुलीचे मामा शैलेश पवार यांच्या घरी गेली होती. संध्याकाळी शिल्पा या मुलीची समजूत काढण्यासाठी भावाच्या घरी गेली असता तिने मुलीने आईसोबत वाद घातला. तेव्हा मुलीने आई शिल्पा व वडील संतोष यांच्या विरूद्ध पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे शिल्पा यांनी मुलीला रबाळे पोलीस ठाण्यात नेले. आई-वडिलांची समजूत काढून त्यांना घरी पाठवून दिले.

  • वादाचे झाले पर्यवसन

30 जुलैला मृत शिल्पा यांचे पती घराबाहेर गेल्यानंतर घरामध्ये त्या त्यांची मुलगी व मुलगा घरात होते. दुपारी शिल्पा यांनी मुलीला अभ्यासावरुन रागावून तिला मारहाण केली. यावेळी त्यांनी हातात सुरी देखील घेतली. याचाच मुलीला आईचा राग आला. आई आणि मुलगी एकमेकींना करत असलेल्या हाणामारीत आईने मुलीच्या हाताला चावा घेतला, आणि मुलीने आईला ढकलून दिले. यात मृत शिल्पा खाली पडल्या. व त्यांच्या डोक्याला बेड लागला. अशातच त्यांच्या मुलीने कराटेचा कापडी पट्टा गळ्याभोवती घट्ट आवळला. शिल्पाने हालचाल बंद होईपर्यंत तसाच धरुन ठेवला. त्यानंतर शिल्पा मृत झाल्याची खात्री झाल्यावरच त्यांच्या मुलीने पट्ट्याची पकड सैल केली.

  • आत्महत्येचा केला बनाव

आईचा खून केल्यानंतर हा प्रकार आत्महत्येचा वाटावा म्हणून शिल्पा यांच्या मुलीने बेडरुमच्या दरवाजाला बाहेरुन असलेली चावी काढली. ती शिल्पा यांच्या बेडरुममध्ये ठेवली. त्यानंतर मुलीने शिल्पा यांचा मोबाईल घेऊन मुलीने तिचे वडील, मामा, मावशी यांना मी माझे आयुष्य संपवित आहे. असा शिल्पा यांच्या नावे इंग्रजीत व्हॉटसऍपवर मेसेज पाठवला. त्यानंतर मुलीने तिच्या वडिलांना फोन करुन आई बेडरुमचा दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्यामुळे शिल्पा यांचे पती यांनी जवळच राहणारा त्यांचा मेव्हणा शैलेश पवार यांना कळविले. शैलेश यांनी तात्काळ बहिणीच्या घरी धाव घेतली. तेव्हा बेडरुमचा दरवाजा तोडल्यानंतर बेडरुममध्ये बहिण शिल्पा ही मृतावस्थेत पडल्याचे आणि तिच्या गळ्याभोवती कराटेचा कापडी पट्टा आवळल्याचे दिसून आले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व शिल्पा जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनात शिल्पा जाधव यांचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत व गळा आवळल्यामुळे झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तपास करण्यासाठी मृत शिल्पा जाधव यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु केली. या चौकशीत पोलिसांनी मुलीकडे विचारपूस केली असता, चौकशीत तिनेच आईची हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी मुलीवर खून आणि पुराव नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे. मुलगी ही अल्पवयीन असल्याने तिची रवानगी बालसुधारगृहात होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स सोबत महत्त्वाची बैठक, या मुद्दयांवर झाली चर्चा

Last Updated : Aug 10, 2021, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.