ठाणे - डॉक्टरवर पार्किंगच्या वादातून शेजारी राहणाऱ्याने धारदार कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवार (दि. 14 फेफ्रुवारी)रोजी मुरबाड शहरातील अंजली गॅस परिसरात असलेल्या रस्त्यावर घडली आहे. या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. (Assault on a Doctor In Thane ) भाऊ मुरबाडे असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. तर, डॉ. धीरज श्रीवास्तव असे जखमी डॉक्टारांचे नाव आहे.
हल्लेखोराला आज न्यायालयात हजर करणार
मुरबाड शहरातील अंजली गॅस परिसरात डॉ. धीरज श्रीवास्तव यांचे क्लिनिक आहे. नेहमी प्रमाणे सोमवारी दुपारी साडेअकरा वाजता त्यांनी क्लिनिकबाहेर आपली दुचाकी पार्क केली होती. मात्र, या ठिकाणी दुचाकी पार्क करू नये असे सांगत भाऊ मुरबाडे याने डॉ. धीरज यांच्या सोबत वाद घातला.
हल्ल्यात गंभीर दुखापत झाली
वाद सुरु असतानाच हल्लेखोराने हातातील काठीने मारहाण केली. मात्र, डॉक्टरने प्रतिकार केला असता हल्लेखोराने गवत कापायच्या लोखंडी कोयत्याने डॉ. धीरज यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी मुरबाड पोलिसांत गुन्हा दाखल होऊन आरोपी मुरबाडे याला पोलिसांनी काल सायंकाळी अटक केली. त्याला आज त्याला न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - Shiv Sena Press Conference Today : कोण आहेत भाजपचे साडेतीन लोक? शिवसेनेची आज पत्रकार परिषद