ठाणे - आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' उपक्रमांंतर्गत केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाला मान्यता दिली आहे. याअंतर्गत सर्व भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशभर हा उपक्रम घरा-घरात पोचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकराने विविध संस्थाच्या माध्यामातून जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्यांदाच लाखो मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील भातसा धारणाला तिरंगाचे रूप देऊन धरणातून झुळझुळ वहाणारे 'तिरंगा'च्या रंगाचे पाणी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले आहे.
वनजमीन संपादित करण्यात आली - मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी शहापूर तालुक्यातील एक महत्त्वाचे धरण म्हणजे भातसा धरण गेल्या महिन्यात ओव्हरफ्लो झाले असून, मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. विशेष म्हणजे धरण क्षेत्रात सात्यत्याने पाऊस पडता आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात धरणाचे पाच दरवाजे काही दिवसांपूर्वी उघडण्यात आले. या भातसा प्रकल्पासाठी १९६९ साली शहापूर तालुक्यातील खाजगी आणि वनजमीन भूसंपादनाची कार्यवाही सुरु करण्यात येऊन १९७३ साली भातसा धरण बांधून पूर्ण करण्यात आले होते. यावेळी भूसंपादनांची प्रक्रिया सुरवातीस बृहन्मुंबई महानगरपालिका आणि त्यानंतर शासनाने केली होती. यासाठी बुडीत क्षेत्रासाठी ४४४.७३ हेक्टर खाजगी आणि २ हजार ६२५ हेक्टर वनजमीन संपादित करण्यात आली होती.
शहापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न निकाली काढणार - मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात गेली अनेक वर्षापासून प्रत्येक उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे. यासाठी गेल्या ८ ते १० वर्षाचा राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी खर्च करून विविध पाणी योजना राबविल्या आहेत. मात्र यासर्व योजना नाममात्र राह्ल्याचे दिसत असल्याने भातसा धरणातून वाहणाऱ्या तिरंगाच्या झुळझुळ पाण्यावर संजय खरडीकर यांनी पाणी टंचाईची व्यथा सोशल मीडियावर कवितेतुन व्यक्त केली आहे. संजय म्हणतात, कि "धरणात पाहिला मी झुळझुळ ता तिरंगा, माझ्या कोरड्या घश्याचा सांगा ना रंग कोणता?” असा कवितेच्या माध्यमातून सवाल उपस्थित केला. त्यामुळे देशाच्या 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' तरी राज्य सरकार शहापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न निकाली काढणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - Indian Independence Day: न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात स्वातंत्र्याची ७५ वर्षा निमित्त विविध कार्यक्रम