मीरा भाईंदर :- भाईंदर पोलिसांच्या तावडीतून एका आरोपीने बेडीसह पळ काढला आहे. आरोपीला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयातुन भाईंदर पोलीस ठाण्यात आणले जात असताना चालत्या गाडीतून उडी मारून पसार झाला आहे. दोन दिवस उलटूनही आरोपीला पोलिसांना पकडण्यात यश आलेले नाही.
दुर्गेश गुप्ता या व्यक्तीला मोबाईल चोरी प्रकरणात भाईंदर पोलिसांनी अटक केली होती .गुरुवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला घेऊन पोलिसांचे एक पथक भाईंदरला येत होते. मात्र परतत असताना चक्क चालत्या गाडीतून या आरोपीने बेडीसह पळ काढला होता. पोलिसांनी नाकाबंदी करून त्याचा शोध सुरू केला. मात्र, दोन दिवस उलटूनही तो पोलिसांना सापडला नाही. अद्याप आरोपी मिळाला नसून शोध मोहीम सुरु असल्याची माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी बलराम पालकर यांनी दिली.
हेही वाचा - औरंगाबाद : विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; गुन्हा दाखल