ETV Bharat / city

भाजपा आमदाराच्या मुलाला 40 लाखांचा गंडा घालून आरोपी पसार

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. आशिष चौधरी असे लाखोंचा गंडा घालून फरार झालेल्याचे नाव आहे.

thane fraud
thane fraud
author img

By

Published : Jul 16, 2021, 5:27 PM IST

Updated : Jul 16, 2021, 5:34 PM IST

ठाणे - सॉफ्टवेअर बनवण्याचे आमिष दाखवून एकाने चक्क भाजपा आमदाराच्या मुलाला 40 लाखाला गंडा घातल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. आशिष चौधरी असे लाखोंचा गंडा घालून फरार झालेल्याचे नाव आहे.

भाजपा आमदाराने केला होता आरोपीचा सत्कार

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना 2018साली त्यांच्या मतदारसंघात राहणाऱ्या आशिष चौधरी याने गुगलमध्ये तिसरा क्रमांक पटकावल्याची माहिती मिळाली. त्यावेळी काही संस्थांनी आशिषचा सत्कार केला. त्यानंतर आमदार गायकवाड यांनीही मतदारसंघातील तरुण असल्याने आशिष चौधरीचा सत्कार केला होता.

पैसे उकळण्यासाठी रचला बनाव

आमदार गायकवाड यांचा मुलगा प्रणव गायकवाड याने मायक्रोनेट इंटरप्रायझेस या आपल्या कंपनीसाठी शिक्षणाकरीता लागणारे सॉफ्टवेअर तयार करण्याची जबाबदारी आशिष याला दिली. आशिषने या सॉफ्टवेअरचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होईल, असे सांगितले. 2 वर्षात त्याने तयार केलेले सॉफ्टवेअर काही विद्यापीठे आणि कॉलेज घेत आहेत, असे त्याने भासविले. मात्र प्रत्यक्षात हा सर्व पैसे उकळण्यासाठी बनाव असल्याचे स्पष्ट झाले.

बनावट कागदपत्रे तयार करून रक्कम मिळताच फरार

आशिषने फेक आयडी आणि अॅग्रीमेंटचे कागद तयार केले होते. 40 लाख रुपये मिळाल्यानंतर आरोपी आशिष पसार झाला. आमदारांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी आशिषचा शोध सुरू केला आहे. लवकरात लवकर आशिषला अटक करण्यात यावी, त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. तसेच त्याच्याकडील डिग्री फेक असल्याचेही त्यांनी सांगितले. आशिषच्या अटकेनंतर त्याने आणखी किती लोकांची फसवणूक केली, ते समोर येणार आहे.

Last Updated : Jul 16, 2021, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.