ETV Bharat / city

Coffee Seller Success Story : नैसर्गिक आपत्तीनंतर कोरोनाचे संकट; तरीही कठीण प्रसंगात 'त्याने' सावरले कुटुंब - coffee business successfully despite natural diester

रवी येंदे या तरुणाने सायकलवरच मोबाईल कॉफी हाऊस ( Coffee house on cyle in Thane ) थाटले. त्याने बेरोजगारीवर मात करून सायकलवर मोबाईल कॉफी विक्री करण्याचा मार्ग पत्करला. त्याच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अवघ्या पाच रुपयांत त्याची कॉफी ही शहरात आकर्षण (Coffee only Rs 5 in Thane) ठरत आहे.

रवी येंदे
रवी येंदे
author img

By

Published : Feb 5, 2022, 8:10 PM IST

ठाणे - सात वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील एका गावावर नैसर्गिक आपत्ती कोसळून भूस्खलनाने अनेक संसार उद्ध्वस्त झाले. त्यामुळे उघड्यावर पडलेल्या त्या कुंटुबांचे केंद्र सरकारने ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये पुनर्वसन केले. आधीच नैसर्गिक आपत्तीमध्ये संसार उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील तरुणांच्या लॉकडाऊनमुळे नोकऱ्या गेल्या. संकटावर मात करीत तरुणाने मेकॅनिकल इंजिनीयरिंगची पदवी घेत व्यवसाय सुरू केला. रवि चंद्रकांत येंदे असे ( Successuful story of Ravi Yende ) या उच्चशिक्षित तरुणाचे नाव आहे.

कठीण प्रसंगात घेतले शिक्षण
२०१४ मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीत पुणे जिल्ह्यातील साखरमाची हे गाव भूस्खलनाने ( Sakharmachi landslide incident ) पूर्णतः उद्ध्वस्त झाले होते. त्यामध्ये अनेक कुटुंबांचे संसार मातीत गाडले जाऊन उघड्यावर आले. त्यांनतर या दुर्घटनेतील ४० कुटुंबांचे सरकारने मुरबाड लगत लांबाचीवाडी येथे ( Rehabilitation of Sakharmachi village in Lambachiwadi ) पुनर्वसन करण्यासाठी स्थलांतरित केले. त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनीयरिंगची पदवी मिळविलेल्या रवीचे कुटुंबही होते. रवीच्या कुटूंबात आई, वडील आणि मोठा किरण भाऊ आहे. वडील एका शाळेत शिफाई असल्याने त्यांनी दोन्ही मुलांना शिक्षण देऊन उच्चशिक्षित केले.

संकटावर मात करत व्यवसाय सुरू

हेही वाचा-Anna Hazare Wrote Letter to CM : अण्णा हजारांचे मुख्यमंत्र्यांना वाईन निर्णयासंदर्भात पत्र; दिला उपोषणाचा इशारा

दुबईत होता नोकरीला
लॉकडाऊन लागण्यापूर्वी काही दिवसापूर्वीच रवी हा दुबईत नोकरी लागली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे दुबईतील नोकरी गेली. त्यानंतर रवी पुन्हा मुरबाडमध्ये आला. तर त्याचा मोठा भाऊ किरणही उच्चशिक्षित आहे. बेरोजगार असल्याने त्यानेही पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी रिक्षा चालविण्याचा मार्ग पत्करला. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्याचाही विवाह झाल्याने तो पत्नीला घेऊन अंबरनाथ येथे खासगी कंपनीत काम करून रिक्षा चालवत आहे. त्यामुळे अविवाहित असलेल्या रवीवर कुटुंबाची जबाबदारी पडली होती.

हेही वाचा-Mumbai Traffic : 'अमृता फडणवीस कशाच्या आधारावर बोलत आहेत?' महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचा सवाल

सायकलवरच थाटले मोबाईल कॉफी हाऊस
रिकाम्या हाताला काम नाही म्हणून मेकॅनिकल पदवी असलेला रवी रोजंदारीवर काम शोधण्यासाठी निघत होता. त्यावेळी हाताला जे काम मिळेल तो करत होता. मात्र, या कामातून त्याच्या शिक्षणाची व घराची गरज भागत नव्हती. त्यामुळे सायकलवर त्याने भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र यामध्ये त्याला खूपच कबाडकष्ट करावे लागत होते. या तरुणाने सायकलवरच मोबाईल कॉफी हाऊस ( Coffee house on cyle in Thane ) थाटले. त्याने बेरोजगारीवर मात करून सायकलवर मोबाईल कॉफी विक्री करण्याचा मार्ग पत्करला. त्याच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अवघ्या पाच रुपयांत त्याची कॉफी ही शहरात आकर्षण ( Coffee only Rs 5 in Thane ) ठरत आहे.

हेही वाचा-Lata Mangeshkar Live Update : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर - डॉ. प्रतीत सामदानी

दिवसाला एक हजाराची कमाई; त्यामुळे बेरोजगार तरुणांना दिला संदेश
विशेष म्हणजे गेल्या ८ महिन्यांपासून रवी हा जागेवर जाऊन ग्राहकांना स्वस्त दरात कॉफी देऊ लागला. यासाठी त्याने स्वतःचा मोबाईल नंबर ग्राहकांना दिला. सकाळपासून रात्रीपर्यत भटकंती करून कॉफी विकत आहे. रवी दिवसाला सुमारे दहा लिटर दूध , दोन किलो साखर व कॉफीचे पाकीट घेऊन दिवसाला सुमारे नऊशे ते हजार रुपये कमावत आहे. अवघ्या पाच रुपये दराने मोबाईल कॉफी विक्रीतून आपल्या परिवाराची जबाबदारी सांभाळत आहे. रवीच्या मते सुशिक्षित तरुणांनी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा एकदा व्यवसाय सुरू करावा. कोरोनामुळे जगभरात लाखो तरुणांच्या नोकरीवर गदा आली आहे. त्यामुळे तरुणांनी खचून न जात स्वतःचा व्यवसाय सुरु करावा. येणारा काळ खूपच कठीण असल्याचेही त्याने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.