ETV Bharat / city

Identity Card for Delivery Boys : ...म्हणून 'डिलिव्हरी बॉईज'ला पोलिसांकडून मिळणार विशेष ओळखपत्र

नौपाडा भागात 23 मार्च रोजी खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयने ( Delivery Boys ) एका घरातील महिलेच्या गळ्यावर सुरा ठेवून तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल लुटला होता. पोलिसांनी त्या डिलिव्हरी बॉयला अटक केली असून त्याच्या दोन साथिदारांच्याही मुसक्या आवळल्या आहेत तर एका साथिदाराचा शोध सुरू आहे. ठाणे पोलिसांनी ( Thane Police ) अटक केलेल्या संशयित आरोपींकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक आरोपी व मुद्देमालासह पोलीस पथक
अटक आरोपी व मुद्देमालासह पोलीस पथक
author img

By

Published : Apr 4, 2022, 7:14 PM IST

ठाणे - ठाण्यात नौपाडा भागात झालेल्या चोरीमुळे आता खाद्य पदार्थ घरपोच पोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉईजला ( Delivery Boys ) चारित्र्य पडताळणीनंतर ( Character Verification ) पोलिसांचे विशेष ओळखपत्र मिळणार ( Identity Card for Delivery Boys ) आहे. यासाठी संपूर्ण आयुक्तालय परिसरात या घरपोच खाद्यपदार्थ पोहोचविण्याची सेवा देणाऱ्या कंपन्यांची लवकरच बैठकही पोलीस आयोजित करणार आहेत. नौपाडा भागात एका डिलिव्हरी बॉयने महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवत 10 लाखांचा मुद्देमाल चोरला होता. त्यानंतरच तपासात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन पोलिसांना ( Thane Police ) हा निर्णय घ्यावा लागला आहे.

माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त

काय होती घटना - 9 मार्चला ठाण्यातील नौपाडा भागात दुपारच्यावेळी एक डिलिव्हरी बॉय मास्क घालून इमारतीत गेला. सुरक्षा रक्षकाला डिलिव्हरीचे कारण देत महिलेच्या घरी जाऊन घरात घुसून गळ्यावर चाकू ठेवत रोकड आणि सोने, अशी 10 लाखांची लूट केली होती. या लुटीचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांना अनेक पथके नेमावी लागली होती.

तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त - पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर जय हेमंत भगत हा डिलिव्हरी बॉय पोलिसांच्या हाती लागला. त्याला शोधण्यासाठी ठाणे पोलिसांनी त्याच्या दुचाकीचा क्रमांक मिळवल्यानंतर ठाणे, मीरा भायंदर, वसई, विरार, वज्रेश्वरी, भिंवडी येथे तांत्रिक तपास केला. तब्बल 67 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. भगत याला अटक केल्यानंतर त्याने अभिषेक देडे, विशाल दोषी व एका अल्पवयीन साथीदाराची माहिती दिली. पोलिसांच्या अभिषेक देडे यास अटक केली असून अल्पवयीन मुलाच्याही मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, विशाल दोषीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी ज्याला चोरीचे दागिने विकले त्यांचाही शोध ठाणे पोलीस घेत आहेत.

पोलिसांकडून गंभीर दखल - खाद्य पदार्थ व इतर साहित्य पुरवणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून ( Delivery Boys ) भविष्यात आणखी अशाप्रकारचे गुन्हा घडू शकतील, यामुळे ठाणे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. चारित्र्य पडताळणीनंतर ( Character Verification ) पोलिसांकडून डिलिव्हरी बॉयला ओळखपत्र ( Identity Card for Delivery Boys ) देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध इमारतीतील नागरिकांना व सुरक्षा रक्षकांच्या पोलिसांनी योग्य त्या सूचना दिल्या असून त्यांना नेमकी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतही सांगितले असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांनी दिली.

हेही वाचा - Thane Crime News : दागिने लंपास करण्यासाठी डोक्यात नारळ मारून केला वृद्ध महिलेचा खून; एकास अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.