ETV Bharat / city

Thane police website hacked : ठाणे पोलिसांची वेबसाइट हॅक, हॅकर्सनी भारत सरकारला माफी मागण्याची केली मागणी

author img

By

Published : Jun 14, 2022, 11:18 AM IST

आज सकाळी ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलिसांची ( Thane police website hacked ) वेबसाईट हॅक करण्यात आली होती. वेबसाईट हॅक केल्यानंतर हॅकर्सनी भारत सरकार तुम्ही वारंवार इस्लामबद्दल ( Thane police website hacked news ) अडचणी निर्माण करत आहात असा संदेश दिला आहे.

thane police website hacked by hackers
ठाणे पोलीस वेबसाई हॅक

ठाणे - आज सकाळी ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलिसांची ( Thane police website hacked ) वेबसाईट हॅक करण्यात आली होती. वेबसाईट हॅक केल्यानंतर हॅकर्सनी भारत सरकार तुम्ही वारंवार इस्लामबद्दल ( Thane police website hacked news ) अडचणी निर्माण करत आहात, तुम्हाला सहनशीलता कळत नाही, लवकरात लवकर माफी मागा, असा संदेश दिला आहे.

हेही वाचा - Thane Water Issue : औरंगाबादनंतर ठाण्यातील पाणी प्रश्नावरुन भाजपा आक्रमक; महापालिकेवर हंडा मोर्चा

नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वेबसाईट हॅक करण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याचाच प्रत्यय आज सकाळी ठाणे पोलिसांना देखील पाहायला मिळाला. आज सकाळी हॅकर्सनी ठाणे पोलिसांची वेबसाइट हॅक करून पोलिसांच्या सायबर सेलला कामाला लावले. ठाणे पोलिसांची वेबसाइट सुरू केल्यानंतर हॅक बाय वन हॅट सायबर टीम, असे लिहिलेले समोर येत होते. पोलिसांना आता या हॅकर्सचा मागोवा घ्यावा लागणार आहे.

नुपूर शर्मांच्या वकिलांनी मागितली मुद्दत - प्रेषित मोहम्मद यांच्या विषयी २७ मे रोजी एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ( nupur sharma controversial statement ) भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्यावर भिवंडीत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी त्यांना १३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स बजावले होते. त्या अनुषंगाने आज (१३ जून रोजी ) शर्मा यांना पोलीस ठाण्यात जबाबासाठी हजर राहावे लागणार होते. मात्र नुपूर शर्मा यांनी आणखी चार आठवड्यांची मुदत पोलिसांकडे मागितली आहे. विशेष म्हणजे रविवारी रात्री उशीरा नुपूर शर्मा यांनी वकिलांमार्फत भिवंडी पोलिसांकडे ई-मेलद्वारे ही मुदत मागितली आहे.

नुपूर शर्मा यांना अटक करण्याची प्रकाश आंबेडर यांची मागणी - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली. मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्याप्रकरणी देशात नुपूर शर्मा यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात येत आहेत.

हेही वाचा - Nupur Sharma : नुपूर शर्माच्या वकिलांचा भिवंडी पोलिसांना ई-मेल; हजर राहण्यास मागितली मुद्दत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.