ETV Bharat / city

ठाण्यात दारूच्या नशेत फेकलेल्या माचिसच्या काडीने तीन दुचाकी पेटल्या - वाघबिल पोलिस ठाणे news

ठाण्यातील घोडबंदर रोड येथील वाघबिल पोलीस चौकीसमोरच दारूच्या नशेत फेकलेल्या माचिसच्या काडीने तीन दुचाकी पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ठाण्यात दारूच्या नशेत फेकेलेल्या माचिसच्या काडीने तीन दुचाकी पेटल्या
author img

By

Published : Aug 16, 2019, 12:04 PM IST

ठाणे - शहरातील घोडबंदर रोड येथील वाघबीळ उड्डाणपुलाखाली मंगळवारी एका व्यक्तीने दारूच्या नशेत फेकलेल्या माचिसच्या काडीने तीन दुचाकी पेटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कासार वडवली पोलिसांनी मोहम्मद सुनोवर अनवर सैय्यद या व्यक्तीस अटक केली आहे.

ठाण्यात दारूच्या नशेत फेकेलेल्या माचिसच्या काडीने तीन दुचाकी पेटल्या

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ उड्डाणपुलाखाली मंगळवारी रात्री तीन दुचाकी जाळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेचा तपास पोलिसांनी अवघ्या काही तासात लावत, मोहम्मद सुनोवर अनवर सैय्यद (19, रा. गोंडा, उत्तर प्रदेश) या व्यक्तीला या प्रकरणा अटक केली आहे. मद्याच्या नशेत त्याने विडी पेटवल्यानंतर माचीसची काडी फेकल्यानंतर अनवधानाने या काडीने दुचाकी पेटल्याची कबुली त्याने कासार वडवली पोलिसांकडे दिली आहे. हा प्रकार धक्कादायक असुन वाहतूक पोलीस चौकी समोर झाल्याने त्याठिकाणी पोलिसांची अनुपस्थिती दाखवणारी आहे.

मागील वर्षी ठाण्यात दुचाकी जाळण्याचे प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वाहन जाळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी वेळीच बेड्या ठोकल्याने वाहनांना आगी लावण्याच्या घटनांना आळा बसला होता. यानंतर पुन्हा घोडबंदर रोड येथील वाघबीळ उड्डाणपुलाखाली अज्ञात व्यक्तीने दुचाकी पेटवल्याची घटना घडल्याने पोलिसही हादरले. एका दुचाकीतुन गळती लागलेल्या पेट्रोलमुळे आग लागताच त्याच्या आजूबाजूला लावलेल्या इतर दोन दुचाकी देखील जळून राख झाल्या. याबाबत कासार वडवली पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेचा तपास करीत असतांना पोलिसांना मोहम्मद सैय्यद हा इसम कासार वडवली नाका येथे आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपल्याकडूनच दुचाकीस आग लावल्याची कबुली दिली.

Intro:दारूच्या नशेत फेकेलेल्या माचिसच्या काडीने पेटल्या तीन दुचाकी वाघबिल चौकीसमोर धक्कादायक प्रकारBody:दारूच्या नशेत फेकेलेल्या माचिसच्या काडीने पेटल्या तीन दुचाकी वाघबिल चौकीसमोर धक्कादायक प्रकार

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबिळ उड्डाणपुलाखाली मंगळवारी रात्री तीन दुचाकी जाळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.या घटनेचा तपास अवघ्या काही तासात लागला असून हे दुचाकी जळीतकांड घडवणाऱ्याला अटक केली आहे.मोहम्मद सुनोवर अनवर सैय्यद (वय-19, गोंडा, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव असून मद्याच्या नशेत त्याने विडी पेटवल्यानंतर अनवधानाने शिलगावलेल्या माचिसच्या काडीने या दुचाकी पेटल्याची कबुली त्याने कासारवडवली पोलिसांकडे दिली आहे.हा प्रकार धक्कादायक असुन वाहतूक पोलीस चौकी समोर झाल्याने त्याठिकाणी पोलिसांची अनुपस्थिती पोलखोल करणारी आहे.
मागील वर्षी ठाण्यात दुचाकी जाळण्याचे प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.. वाहन जाळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी वेळीच बेड्या ठोकल्याने वाहनांना आगी लावण्याच्या घटनांना आळा बसला होता.मात्र, मंगळवारी रात्री 3 वाजेच्या सुमारास पुन्हा घोडबंदर रोड येथील वाघबीळ उड्डाणपुलाखाली अज्ञात व्यक्तीने दुचाकी पेटवल्याची घटना घडल्याने पोलिसही हादरले.एका दुचाकीतुन गळती लागलेल्या पेट्रोलमुळे आग लागताच त्याच्या आजूबाजूला लावलेल्या इतर दोन दुचाकी देखील जळून राख झाल्या. याबाबत कासारवडवली पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेचा तपास करीत असतांना पोलिसांना मोहम्मद सैय्यद हा इसम कासारवडवली नाका येथे आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपणच दुचाकीस आग लावल्याची कबुली दिलीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.